Pillion Helmet Rule: आता मागे बसणाऱ्यालाही हेल्मेट सक्ती, रस्ते सुरक्षेसाठी मोठा निर्णय! टप्प्याटप्प्याने होणार अंमलबजावणी

new helmet rule for two wheeler: वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेत आला
Road Safety Decision
Road Safety DecisionDainik Gomantak
Published on
Updated on

Goa Pillion Helmet Rule: गोव्यातील रस्ते अपघातांचे वाढते प्रमाण लक्षात घेता, राज्य सरकारने रस्ते सुरक्षेबाबत एक महत्त्वपूर्ण निर्णय घेण्याची तयारी सुरू केली आहे. आता केवळ दुचाकी चालकालाच नव्हे, तर मागे बसणाऱ्या प्रवाशाला (Pillion Rider) देखील ISI मार्क असलेले हेल्मेट घालणे अनिवार्य केले जाणार आहे. वाहतूक मंत्री मावीन गुदिन्हो यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या राज्य रस्ते सुरक्षा परिषदेच्या बैठकीत हा प्रस्ताव चर्चेत आला.

मोटार वाहन कायद्याची कडक अंमलबजावणी

केंद्र सरकारच्या मोटार वाहन कायद्यातील कलम १२९ नुसार, दुचाकीवरून प्रवास करणाऱ्या दोन्ही व्यक्तींनी हेल्मेट घालणे बंधनकारक आहे. गोव्यात आता या कलमाची कडक अंमलबजावणी करण्यावर सरकारचा भर आहे.

मात्र, हा नियम लगेच लागू न करता तो टप्प्याटप्प्याने अंमलात आणला जाईल. विशेष म्हणजे, रस्ते सुरक्षा मानकांनुसार केवळ आयएसआय प्रमाणित हेल्मेटच ग्राह्य धरले जातील, ज्यामुळे अपघाताच्या वेळी डोक्याला होणाऱ्या गंभीर दुखापती टाळता येतील.

Road Safety Decision
Goa Traffic Update: बीच सेलिब्रेशनसाठी गोव्याला चाललाय? वाहतूक नियमांत मोठा बदल; पार्किंग, पर्यायी रस्त्यांची माहिती घ्या एका क्लिकवर..

अंमलबजावणीचे वेळापत्रक आणि जनजागृती

मिळालेल्या अधिकृत माहितीनुसार, हा नवीन नियम चालू आर्थिक वर्षात लागू केला जाणार नाही. वाहतूक विभागाकडून रीतसर अधिसूचना प्रसिद्ध झाल्यानंतरच त्याची अंमलबजावणी सुरू होईल. त्यापूर्वी राज्य सरकार मोठ्या प्रमाणावर सार्वजनिक जनजागृती मोहीम राबवणार आहे. लोकांना नियमांचे महत्त्व पटवून दिल्यानंतरच दंडात्मक कारवाईला सुरुवात केली जाईल.

राष्ट्रीय रस्ते सुरक्षा महिना आणि मोहीम

योगायोगाने, १ जानेवारीपासून देशभर 'नॅशनल रोड सेफ्टी मंथ' पाळला जातोय. याच मुहूर्तावर गोव्याने या प्रस्तावाला गती दिलीये. या महिन्यात पोलीस आणि वाहतूक विभागाकडून हेल्मेटचे महत्त्व, रस्ते सुरक्षा नियम आणि आयएसआय मार्क हेल्मेट का वापरावे, याबद्दल मार्गदर्शन केले जाईल.

अपघातांचे प्रमाण कमी करण्याचे लक्ष्य

गोव्यात गेल्या काही काळात झालेल्या दुचाकी अपघातांमध्ये, हेल्मेट नसल्यामुळे किंवा निकृष्ट दर्जाचे हेल्मेट असल्यामुळे अनेक प्रवाशांना आपला जीव गमवावा लागला आहे. पिलियन रायडरला हेल्मेट नसल्यामुळे होणाऱ्या मृत्यूंची संख्या मोठी आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com