Goa Accident Death Dainik Gomantak
गोवा

Goa Accident Death: मॉर्निंंग वॉक दरम्यान काळाचा घाला; पत्रादेवी येथे 65 वर्षीय वृद्धाला कंटेनरने चिरडले, चालकाला रत्नागिरीतून अटक

Patradevi container accident senior citizen death: पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघात घडला आहे.

Sameer Amunekar

पणजी: पत्रादेवी येथे राष्ट्रीय महामार्ग ६६ (NH-66) वर एक अत्यंत हृदयद्रावक आणि धक्कादायक अपघात घडला आहे. नेहमीप्रमाणे पहाटेच्या वेळी फिरायला गेलेल्या एका ६५ वर्षीय वृद्धाला एका भरधाव कंटेनर ट्रकने चिरडले. या भीषण अपघातात वृद्धाचा जागीच दुर्दैवी मृत्यू झाला. अपघात घडल्यानंतर तत्काळ घटनास्थळावरून पळ काढणाऱ्या ट्रक चालकाचा छडा लावण्यात पोलिसांना यश आले असून, मोपा पोलिसांनी रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा येथून आरोपी चालकाला बेड्या ठोकल्या आहेत.

पहाटेच्या शांततेत काळाचा घाला

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, नारायण सहदेव सावळ (वय ६५ वर्षे) असे या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या वृद्धाचे नाव आहे. नारायण सावळ हे रोजच्या प्रमाणे पत्रादेवी येथील राष्ट्रीय महामार्गाच्या कडेने मॉर्निंग वॉक करत होते.

यावेळी महामार्गावरून जात असलेल्या एका अवजड कंटेनर ट्रकच्या चालकाने आपल्या वाहनावरील नियंत्रण गमावले आणि त्याने सावळ यांना जोरदार धडक दिली. धडक इतकी भीषण होती की, नारायण सावळ हे कंटेनरच्या चाकाखाली चिरडले गेले आणि गंभीर दुखापत झाल्यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.

अपघात करून चालक फरार

अपघातानंतर रस्त्यावर रक्ताच्या थारोळ्यात पडलेल्या वृद्धाला मदत करण्याऐवजी कंटेनर चालकाने तेथून पळ काढण्याचा प्रयत्न केला. त्याने आपला कंटेनर न थांबवता थेट गोव्याची सीमा ओलांडून महाराष्ट्राच्या दिशेने पलायन केले.

या घटनेची माहिती मिळताच मोपा पोलीस ठाण्याचे पथक तात्काळ घटनास्थळी दाखल झाले. पोलिसांनी आजूबाजूच्या परिसरातील माहिती गोळा केली आणि वायरलेस संदेशाद्वारे शेजारील राज्यातील पोलीस यंत्रणेलाही सतर्क केले.

रत्नागिरीच्या आवळल्या मुसक्या

मोपा पोलिसांनी अत्यंत वेगाने तपासाची चक्रे फिरवत फरार कंटेनरचा माग काढण्यास सुरुवात केली. आधुनिक तंत्रज्ञान आणि स्थानिक खबऱ्यांच्या मदतीने या ट्रकचे लोकेशन ट्रॅक करण्यात आले.

अखेर गोव्यापासून बऱ्याच अंतरावर असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यातील लांजा या ठिकाणी मोपा पोलिसांच्या पथकाने सापळा रचून या पळून गेलेल्या चालकाला ताब्यात घेतले. या प्रकरणी पोलिसांनी चालकाविरुद्ध बेजबाबदारपणे वाहन चालवून मृत्यूस कारणीभूत ठरल्याबद्दल गुन्हा दाखल केला असून, पुढील कायदेशीर कारवाई सुरू आहे. महामार्गावरील वाढत्या अनियंत्रित वेगामुळे स्थानिक नागरिकांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Star Cricketer Retirement: ''मी लढाई हरलो...'', स्टार वेगवान गोलंदाजाने आंतरराष्ट्रीय क्रिकेटला ठोकला रामराम; सततच्या दुखापतींना कंटाळून घेतला मोठा निर्णय

Asian Games Final 2026: अजिंक्य टीम इंडियाची 'गोल्ड' कामगिरी! फायनलमध्ये भारतीय पोरींनी श्रीलंकेला 147 धावांनी लोळवलं; एशियन गेम्समध्ये भारताचा डंका

Women Cancer Symptoms : महिलांमध्ये सर्वाधिक आढळणारा कर्करोग कोणता? 'ही' लक्षणं दिसल्यास वेळीच तपासणी करा

Goa Ranji 2026: गोव्याच्या रणजी संघाची तयारी अंतिम टप्प्यात, स्पर्धेपूर्वी महाराष्ट्राविरुद्ध दोन सराव सामने; खेळाडूंच्या कामगिरीकडे लक्ष

Goa Rain Shortage: पाऊस न पडल्यास भातशेती धोक्यात; कणसे धरू लागल्याने दिवसातून किमान एक हलकी सर आवश्यक, कृषी संचालकांचा इशारा

SCROLL FOR NEXT