Goa Weather: 48 तास महत्त्वाचे! दोन दिवस कोसळणार पाऊस; हवामान विभागाकडून 'यलो अलर्ट' जारी

Goa Unseasonal Rain: गुरूवारी यलो अलर्ट त्यासोबतच पुढील दोन दिवस देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे.
Dark rain clouds over Goa after IMD yellow alert
Dark rain clouds over Goa after IMD yellow alertDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: दोन-तीन दिवसांपासून विविध भागात अवकाळी पाऊस पडत असून गुरूवारी राज्यातील काही भागात ताशी ३० ते ४० किमी प्रती तासाच्या वेगाने वारे वाहत असून पाऊस पडण्याची शक्यता असल्याने गोवा वेधशाळेने ‘यलो अलर्ट’ जारी केला आहे. अवकाळी पावसाच्या पार्श्‍वभूमीवर नागरिकांनी योग्य ती काळजी घेण्याचे आवाहन करण्यात आले आहे.

Dark rain clouds over Goa after IMD yellow alert
Sattari Unseasonal Rain: सत्तरीला चक्रीवादळाचा तडाखा; झाडांची पडझड, घरांचे नुकसान; वीज, पाणी व दूरसंचार सेवा ठप्प

बुधवारी कमाल ३२.४ अंश सेल्सिअस तर किमान २७ अंश सेल्सिअस तापमानाची नोंद करण्यात आली आहे. गेल्या २४ तासांत राज्यात केवळ काणकोण येथे १.२ मिमी पावसाची नोंद करण्यात आली. गुरूवारी यलो अलर्ट त्यासोबतच पुढील दोन दिवस देखील तुरळक पाऊस पडण्याची शक्यता आहे. मॉन्सून अजून अंदमान समुद्रातच असल्याने अजून अंदमान पाऊस दाखल झालेला नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com