Goa Police Dainik Gomantak
गोवा

Bhumika Temple Dispute: भूमिका देवीचा 'कालोत्सव' पोलिस बंदोबस्तात संपन्न, 77 जणांविरुद्ध गुन्ह्याची नोंद

Bhumika Temple Controversy: कोणत्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये याची खास काळजी घेत उत्सवासाठी पर्ये भूमिका देवस्थानच्या आवारात सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला.

गोमन्तक डिजिटल टीम

वाळपई: पर्ये-सत्तरी येथील श्री सप्तशती भूमिका देवीचा कालोत्सवा दरम्यान गावकरी आणि माजिक समाज यांच्या दोन गटात झालेल्या मानापमानाच्या वादानंतर पोलिसांच्या कडक बंदोबस्तात दुसऱ्या दिवशीचा उत्सव शांततेत पार पडला.

गुरुवारी (16 जानेवारी) माजिक समाजातील काही जणांनी पोलिस तसेच नागरिक व भाविकांवर हल्ला करत अनेकांना जखमी केले होते. कोणत्याही प्रकारची शांतता भंग होऊ नये याची खास काळजी घेत उत्सवासाठी पर्ये भूमिका देवस्थानच्या आवारात सकाळपासूनच कडक पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. दरम्यान, याप्रकरणी ७७ जणांविरुद्ध गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

दिवसभर उत्सवासाठी भाविकांची रेलचेल सुरू होती. मंदिरात (Temple) झालेल्या वादामुळे भाविकांचा अल्प प्रतिसाद लाभला. मात्र, सर्वत्र शांतता होती. पोलिस उपअधीक्षक जिवबा दळवी यांच्या मार्गदर्शनाखाली कडक बंदोबस्त तैनात करण्यात आला होता व कोणत्याही प्रकारचा तणाव निर्माण होऊ नये याची खास काळजी घेण्यात आली होती.

सत्तरीचे मामलेदार धिरेश बाणावलीकर, उपअधीक्षक जिवबा दळवी, पोलिस निरीक्षक विदेश शिरोडकर मंदिरात पहाटेपासून उपस्थित होते व प्रत्येक घडामोडीवर बारीक लक्ष ठेवून होते. मंदिरात होणारा सर्व विधी त्यांच्या देखरेखीखाली झाला. संध्याकाळी गवळण कालोत्सव होऊन रात्री नाट्यप्रयोग झाल्यानंतर कालोत्सवाची सांगता झाली.

जखमींची प्रकृती स्थिर

बुधवारी झालेल्या हल्ल्यात जखमी झालेल्यांत २५ गावकरी व १५ पोलिसांचा समावेश आहे. सर्वांची प्रकृती स्थिर आहे. सिताराम गावकर यांच्या डोक्याला जबर मार लागून ते जखमी झाले होते व त्यांची प्रकृती चिंताजन होती. मात्र, आज त्यांची प्रकृती चांगली असल्याचे सांगण्यात आले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Horoscope: मंगळ करणार 'त्रिगुणी संचार'!! सुरु होणार धन, सुख आणि समृद्धीचा प्रवाह; 3 राशींना मिळणार फायदा

Canacona: रायींमध्ये देवत्व लाभलेला, दूधसागरकडे जाताना लक्ष वेधून घेणारा 'मधुवृक्ष जर्माल'

Cluster University Goa: एकेकाळी 'गोवा युनिव्हर्सिटी'ला केंद्रीय दर्जा देण्याची चर्चा चालली होती; क्लस्टर विद्यापीठांची संकल्पना

Goa Live News: भाजप गोवा राज्य संघटनात्मक कार्यशाळेला म्हापसा येथे सुरुवात

Narve: नार्वेच्या पंचगंगेच्या तीरावर भरली ‘अष्टमीची’ जत्रा; भरपावसातही भक्तीचा उत्साह

SCROLL FOR NEXT