Maharashtra Youth Death Goa Dainik Gomantak
गोवा

पार्टी पडली महागात! रात्रभर सेलिब्रेशन, पहाटे अस्वस्थता अन् महाराष्ट्राच्या तरुणाचा मृत्यू; ड्रग्जचा ओव्हरडोस की हार्ट अटॅक? तपास सुरू

Maharashtra Youth Death Goa: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील एका पार्टीनंतर महाराष्ट्रातील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

Sameer Amunekar

पणजी: पर्यटनासाठी प्रसिद्ध असलेल्या गोव्यातील एका पार्टीनंतर महाराष्ट्रातील एका ३२ वर्षीय तरुणाचा मृत्यू झाल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. उत्तर गोव्यातील मोरजी येथे सोमवारी पहाटे ही घटना घडली. या मृत्यूमुळे पुन्हा एकदा गोव्यातील पार्ट्या आणि त्यांमधील अंमली पदार्थांच्या वापराचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. पोलिसांनी सध्या या प्रकरणी 'अनैसर्गिक मृत्यू'ची नोंद केली असून अधिक तपास सुरू आहे.

पार्टीनंतर प्रकृती बिघडली

मिळालेल्या माहितीनुसार, हा तरुण आपल्या मित्रांसोबत सुट्ट्या घालवण्यासाठी गोव्यात आला होता. रविवारी रात्री त्यांनी हणजूण येथील एका ठिकाणी पार्टी केली. रात्रभर चाललेल्या या मौजमजेनंतर पहाटेच्या सुमारास सर्व मित्र मोरजी येथील आपल्या भाड्याच्या खोलीवर परतले. मात्र, खोलीवर पोहोचल्यानंतर संबंधित तरुणाला अचानक अस्वस्थ वाटू लागले. त्याला श्वास घेण्यास त्रास होत होता आणि छातीत तीव्र वेदना होत असल्याचं त्यानं आपल्या मित्रांना सांगितलं.

उपचारापूर्वीच मृत्यू

तरुणाची प्रकृती खालावल्याचे पाहून मित्रांनी त्याला तातडीने शिवोली येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात दाखल केले. मात्र, दुर्दैवाने रुग्णालयात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. या घटनेची माहिती मिळताच पोलिसांनी घटनास्थळी धाव घेत पंचनामा केला. प्राथमिक तपासात शरीरावर कोणत्याही जखमांच्या खुणा नसल्याने पोलिसांनी घातपाताची शक्यता नाकारली आहे.

ड्रग्जचा अँगल आणि फॉरेन्सिक तपास

तरूणाचा मृत्यू नेमका कशामुळे झाला, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही. मात्र, पोलिसांनी अंमली पदार्थांच्या सेवनाचा संशय व्यक्त केला आहे. पार्टीमध्ये काही घातक पदार्थांचे सेवन केल्यामुळे हृदयविकाराचा झटका आला असावा किंवा 'ओव्हरडोज' झाला असावा, या दिशेने तपास सुरू आहे.

मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवण्यात आला असून, व्हिसेरा (Viscera) राखून ठेवला जाणार आहे. अहवाल आल्यानंतरच मृत्यूचे खरे कारण समोर येईल, असे पोलीस अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Watch Video: अय्यरच्या 'सुपरमॅन' अवतारावर रोहित-सूर्याचे विस्फारले डोळे, चाहत्यांच्या काळजाचा ठोका चुकला; श्रेयसचा धडाकेबाज कॅच व्हायरल

Omkar Elephant: 'ओंकार'चा उगवे भागात धुमाकूळ, संतप्त नागरिकांकडून सरकारविरोधात रस्त्यावर उतरण्याचा इशारा

Cavelossim Assolna bridge: केळशी-असोळणा पुलाची धोकादायक फट बुजवली, वॉरन यांनी वेधले लक्ष; 4 तासांत रस्‍त्‍याची दुरुस्‍ती

VIDEO: अर्शदीपचा वार अन् 'सूर्या'ची हार! सूर्यकुमार यादवच्या बॅटिंगनं चाहत्यांचं फिरलं डोकं; सोशल मीडियावर टीकेचा भडीमार

इराण 440 किलो युरेनियम अमेरिकेकडे सोपवणार? ट्रम्पचा धक्कादायक दावा; म्हणाले, ''करारासाठी स्वतः इस्लामाबादला जाणार''

SCROLL FOR NEXT