Mexico Shooting: मेक्सिकोमध्ये अज्ञात बंदूकधाऱ्यांचा अंदाधुंद गोळीबार, लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू; शेकडो लोकांनी सोडली घरे

Puebla Gunmen Attack 10 Killed: मेक्सिकोच्या पूर्व-मध्य भागातील प्यूब्ला राज्यामधील तेहुइत्जिंगो शहरात रविवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक हल्ला चढवला.
Puebla Gunmen Attack 10 Killed
Mexico ShootingDainik Gomantak
Published on
Updated on

Mexico Mass Shooting: मेक्सिकोमधून एक अत्यंत धक्कादायक आणि हृदयद्रावक घटना समोर आली. मेक्सिकोच्या पूर्व-मध्य भागातील प्यूब्ला राज्यामधील तेहुइत्जिंगो शहरात रविवारी अज्ञात बंदूकधाऱ्यांनी अचानक हल्ला चढवला. या हल्लेखोरांनी कोणत्याही कारणाशिवाय तिथल्या निष्पाप नागरिकांवर अंधाधुंध गोळीबार करण्यास सुरुवात केली. या भीषण रक्तपातामध्ये एका निष्पाप लहान मुलासह 10 जणांचा जागीच मृत्यू झाला.

प्यूब्ला राज्याच्या सार्वजनिक सुरक्षा एजन्सीने या संपूर्ण घटनेला दुजोरा दिला असून या संदर्भात अधिकृत निवेदन जारी केले. सुरक्षा यंत्रणेने दिलेल्या माहितीनुसार, मृतांमध्ये 6 पुरुष, 3 महिला आणि एका लहान बालकाचा समावेश आहे. या घटनेमुळे मेक्सिकोमधील गुन्हेगारांचे धाडस किती वाढले हे पुन्हा एकदा सिद्ध झाले.

Puebla Gunmen Attack 10 Killed
Iran America War: इराणकडून तीन जहाजांवर पुन्हा एकदा गोळीबार, दोन जहाजे घेतली ताब्‍यात; शस्त्रसंधीला अमेरिकेची मुदतवाढ

या भयानक सामूहिक हत्याकांडानंतर संपूर्ण परिसरात सध्या शांतता पसरली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. प्रकरणाचे गांभीर्य ओळखून केंद्रीय अधिकाऱ्यांनी स्वतः तपासाची सूत्रे हाती घेतली असून या घटनेची सखोल चौकशी सुरु केली. मात्र, एवढी मोठी घटना घडूनही स्थानिक प्रशासनाला अद्याप हल्लेखोरांचा कोणताही ठोस पुरावा मिळालेला नाही. या हत्याकांडामागे कोणत्या गँगचा हात आहे किंवा कोणताही संशयित पोलिसांच्या (Police) ताब्यात आला आहे की नाही, हे अद्याप स्पष्ट करण्यात आलेले नाही. प्यूब्लाचे गव्हर्नर अलेजांद्रो अर्मेंटा यांनीही या घटनेवर मौन बाळगल्याने स्थानिक लोकांमध्ये संताप आणि भीती आणखी वाढली.

Puebla Gunmen Attack 10 Killed
Iran America War: पुन्हा इतिहास मोठं वळण घेईल?

प्यूब्ला राज्यात अशा प्रकारे सरेआम रक्ताचा सडा पडण्याची ही पहिलीच वेळ नाही. गेल्या काही महिन्यांपासून हा संपूर्ण परिसर सतत हिंसक घटनांचा साक्षीदार बनत आहे. याच वर्षाच्या फेब्रुवारी महिन्यात प्यूब्ला राज्यातील 'हुएहुएटलान एल ग्रांडे' या दुसऱ्या शहरात अशाच प्रकारच्या गँगवारमध्ये 6 जणांची निर्घृण हत्या करण्यात आली होती. त्या घटनेनंतर काही दिवसांतच प्यूब्लाच्या राजधानीत एका चालत्या वाहनावर हल्ला झाला, ज्यात 3 लोकांना प्राण गमवावे लागले होते. यावरुन गुन्हेगारांच्या मनातून कायद्याची भीती पूर्णपणे नष्ट झाल्याचे स्पष्ट होत आहे.

Puebla Gunmen Attack 10 Killed
Mexico Firing: मेक्सिकोमध्ये दिवसाढवळ्या गोळीबार, भारतीय नागरिकाच्या मृत्यूनंतर 'ही' मोठी अपडेट आली समोर

मध्य मेक्सिकोच्या (Mexico) या भागात सध्या गुन्हेगारी टोळ्या आणि ड्रग्ज कार्टेल यांच्यातील वर्चस्वाची लढाई शिगेला पोहोचली. या गँगवारची सर्वात मोठी किंमत सामान्य आणि निष्पाप नागरिकांना मोजावी लागत आहे. गुन्हेगारांच्या या दहशतीमुळे लोक स्वतःच्या घरातही सुरक्षित राहिलेले नाहीत. परिस्थिती इतकी बिघडली की, गेल्या काही काळात सुमारे 800 ते 1000 कुटुंबांना आपले प्राण वाचवण्यासाठी आपली वडिलोपार्जित घरे सोडून दुसऱ्या सुरक्षित ठिकाणी स्थलांतर करावे लागले. हे पलायन म्हणजे मेक्सिकोमधील सुरक्षा यंत्रणा पूर्णपणे कोलमडल्याचा जिवंत पुरावा आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com