Goa Party Dainik Gomantak
गोवा

Goa Party: विदेशी, गोव्याबाहेरील पर्यटकांच्‍या पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू कशा ?

रात्रभर धुडगूस : गोवेकरांच्या पार्ट्यांवर कारवाई होत असल्‍याचा आरोप

दैनिक गोमन्तक

Goa Party: मांद्रे मतदारसंघातील मोरजी, आश्‍‍वे, मांद्रे, हरमल किनारी भागात वारंवार होणाऱ्या ध्वनिप्रदूषणामुळे पर्यटन व्यवसाय धोक्यात येण्याची भीती व्‍यक्त करण्‍यात येत आहे. रात्री 10 नंतर संगीत पार्ट्यांना कायद्याने बंदी असतानाही त्‍या राजरोसपणे पहाटेपर्यंत चालतात. विशेष म्‍हणजे गोमंतकीयांच्‍या पार्ट्या जबरदस्‍तीने बंद केल्या जातात.

तर बिगर गोमंतकीय, विदेशी पर्यटकांचा सहभाग असलेल्या पार्ट्या पहाटेपर्यंत सुरू कशा असतात?, त्यावर कारवाई का केली जात नाही? पोलिसांवर कोणाचा दबाव आहे का? असे सवाल उपस्‍थित करण्‍यात येत आहेत.

उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार रात्री दहानंतर मोकळ्‍या जागेत कोणत्‍याच प्रकारचे संगीत वाजवण्‍यास बंदी आहे. या नियमाचे उल्लंघन करणाऱ्यांवर पोलिसांनी कडक कारवाई करावी, असा आदेशही न्‍यायालयाने दिला आहे. तरीसुद्धा पोलिस आणि अधिकाऱ्यांच्‍या नाकावर टिच्चून पाट्या रात्रभर सुरू आहेत.

पेडणे पोलिसांनी केवळ ‘मार्बेला बीच रिसॉर्ट’वर गुन्हा दाखल केला आहे. मात्र अन्‍यत्र पहाटेपर्यंत सुरू असलेल्‍या पार्ट्या व आयोजकांवर गुन्‍हा का दाखल केला नाही. याची चौकशी आता खुद्द मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी करावी, अशी मागणी ध्वनिप्रदूषण नियंत्रण समितीनचे ॲड. प्रसाद शहापूरकर व संदेश शेटगावकर यांनी केली आहे.

किनारी भागात संगीत रजनीसाठी कोणाला परवाने दिलेले आहेत, हे केवळ पेडणे पोलिस व उपजिल्हाधिकाऱ्यांना माहीत असेल. याबाबत अजूनही स्थानिक पंचायती तसेच ध्वनिप्रदूषण नियंत्रण समिती अनभिज्ञ आहे.

मोरजी पंचायतीच्या नोटिशीचं काय झालं?

मोरजी पंचायतीने आपल्‍या पंचायत क्षेत्रातील किनारी भागातील हॉटेल्स, रेस्टॉरंट्‌स, नाईट क्लबना लेखी नोटीस पाठवून रात्री दहानंतर ध्‍वनिप्रदूषण केलं तर परवाने रद्द करण्याचा आदेश दिला होता. परंतु आजपर्यंत या पंचायतीने कितीजणांवर कारवाई केली, हा एक संशोधनाचा विषय होऊन बसला आहे.

काही ठिकाणी पहाटेपर्यंत संगीत पार्ट्या होत असल्याच्या नागरिकांच्या तक्रारी आहेत. पोलिसांना कल्‍पना देताच ते येतात, काही काळ पार्टी बंद होते व पोलिस गेल्‍यावर पुन्‍हा सुरू होते. या प्रकरणी पोलिसांवर कुणाचा दबाव आहे का, याचा शोध आता मुख्यमंत्र्यांनी घ्यावा अशी मागणी केंद्रीय मानवाधिकार संघटना उत्तर गोवा संयुक्त सचिव निवृत्ती शिरोडकर यांनी केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Today's Live Updates Goa: शव प्रदर्शन सोहळा एक आंतरराष्ट्रीय कार्यक्रम बनणार आहे: मुख्यमंत्री

St. Xavier Exposition: 46 दिवसांचा वाहतूक आराखडा तयार; जाणून घ्या सर्व पर्यायी मार्ग आणि पार्किंग व्यवस्था

Goa Opinion: केवळ मुसलमान म्हणून विरोध?

Priya Yadav Case: 'प्रिया'चे Cash For Job कनेक्शन महाराष्ट्रापर्यंत? ‘ते’ रेल्वे अधिकारी कोण? रोज नवीन भानगडी उघडकीस

Goa App: 8.43 कोटी रुपयांची गुंतवणूक मिळवण्याची संधी हुकली; गोव्याचा उद्योग अमेरिकेत Tim Draper च्या शोमध्ये झळकला पण...

SCROLL FOR NEXT