Goa News: ‘नाना-नानी नातवंडे पार्क’ ठरतोय वृद्धांसाठी विरंगुळा अन् खेळाडूंसाठी वरदान

नाना-नानी नातवंडे पार्क लहान मुलांबरोबरच ज्‍येष्‍ठांनाही विरंगुळ्‍यासाठी उपयोगी पडत आहे.
Goa News
Goa NewsDainik Gomantak
Published on
Updated on

Goa News: पर्वरीचे आमदार रोहन खंवटे यांनी ‘नाना-नानी नातवंडे पार्क’ची योजना सुमारे आठ वर्षांपूर्वी आखली. त्‍यानुसार त्‍यांनी सरकार दरबारी सातत्‍याने पाठपुरावा करून 8 डिसेंबर 2016 रोजी तत्‍कालीन उपमुख्यमंत्री फ्रान्सिस डिसोझा यांच्या हस्ते पायाभरणी करून या पार्कच्या बांधकामाची सुरुवात केली. अखेर 2019 साली हा पार्क पूर्णत्वास आला. आता हा पार्क लहान मुलांबरोबरच ज्‍येष्‍ठांनाही विरंगुळ्‍यासाठी उपयोगी पडत आहे.

राजधानी पणजीपासून जवळच असलेल्‍या पर्वरीत वसाहती व काँक्रीटचे जंगल वाढू लागले आहे. त्‍यामुळे झाडांची कत्तल होऊन मुलांना व वयोवृद्धांना खेळण्यासाठी किंवा निवांत बसण्यासाठीची ठिकाणे गायब होऊ लागली आहेत.

ही गोष्‍ट लक्षात घेऊन पेन्ह द फ्रान्सचे तत्‍कालीन सरपंच घनश्याम ऊर्फ रवी नाईक, पंचसदस्य स्वप्निल चोडणकर व आमदार रोहन खंवटे यांना ‘नाना-नानी नातवंडे पार्क’ची योजना सुचली.

Goa News
Goa Festival: भाविकांनी उधळला गुलाल; गोव्यातील इंत्रुजोत्सवाचा समारोप

सभोवतालच्या अनेक भागांतून तसेच शिवोली, सांताक्रुझ, आल्तो पर्वरी, बेती, साल्वादोर-द-मुन्‍द, पणजी, पर्रा, सांगोल्डा, साळगाव, पिलार, पिळर्ण वगैरे ठिकाणाहून मुले खास सहलीसाठी या पार्कला भेट देत असतात. त्‍यासाठी नाममात्र देखरेख शुल्क आकारले जाते.

पांडुरंग साळी हे पर्यवेक्षक म्‍हणून तेथे कार्यरत आहेत. विद्यमान पंचसदस्य घनश्याम ऊर्फ रवी नाईक यांनी सांगितले की, आमदार खंवटे यांच्या कालावधीत पर्वरी मतदारसंघात अनेक चांगली कामे झाली.

त्यापैकी ‘नाना-नानी नातवंडे पार्क’ हे चांगले उदाहरण आहे. वयोवृद्धांच्‍या विरंगुळ्‍याची व लहान मुलांच्या खेळण्याची चांगली सोय तेथे आहे.

Goa News
Music Festival: म्हापशात रंगणार स्वर अभिषेकी संमेलन

नानाविध सुविधा; खेळांसाठी मैदाने

कम्युनिटी हॉल, वाचनालय, ज्येष्ठ नागरिकांसाठी जिम, बॅटमिंटन कोर्ट, व्‍हॉलिबॉल-क्रिकेट मैदान, स्केटिंगसाठी रोलिंग, संध्याकाळी सात वाजल्यापासून रात्री साडेआठपर्यंत एफएम सर्व्हिसेस, प्रसाधनगृह व इतर अनेक सोयींनी युक्त असे पार्क तयार झाले.

पेन्ह द फ्रान्स पंचायतीच्या ग्रामसभा तसेच प्रत्येक रविवारी डॉ. हेदे यांच्या मार्गदर्शनाखाली आरोग्य शिबिरे या कम्युनिटी हॉलमध्ये असतात.

‘नाना-नानी नातवंडे पार्क’ची रचना सुयोग्‍य असून त्यासाठी आमदार रोहन खंवटे यांनी विशेष परिश्रम घेतले आहेत. या पार्कमुळे लहान मुलांच्‍या खेळण्‍याची तसेच ज्‍येष्‍ठांसाठी विरंगुळ्‍याची चांगली सोय झालेली आहे. अनेक शाळांतील मुले सहलीचा आनंदही येथे लुटतात. - स्वप्निल चोडणकर, पेन्ह द फ्रान्सचे सरपंच

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com