World Tribal Day  Dainik Gomantak
गोवा

World Tribal Day: आदिवासींवर आजही अन्याय, मणिपूर घटनेतूनही झाले सिद्ध; समाजाने संघटित होण्याची गरज

गोविंद गावडे : ‘उटा’तर्फे जागतिक आदिवासी दिन कार्यक्रम उत्साहात

गोमन्तक डिजिटल टीम

World Tribal Day आमच्या पूर्वजांनी अत्यंत हालाखीने जीवन व्यतीत केले; परंतु ते ताठ मानेने जगले; परंतु आजही आदिवासी समाजाला आपल्या प्रश्‍नांसाठी संघर्ष करावा लागतो; कारण आम्ही एकत्र येत नाही. आम्ही दबावाखाली जगतो याची खंत वाटते.

आम्ही कोणाची गुलामगिरी न पत्करता आपल्या हक्कांसाठी छातिठोकपणे संघर्ष करणे गरजेचे असल्याचे प्रतिपादन कला व संस्कृतीमंत्री गोविंद गावडे यांनी केले.

गावडे इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा येथे ‘उटा’ संघटनेतर्फे आयोजित जागतिक आदिवासी दिन कार्यक्रमात बोलत होते. यावेळी व्यासपीठावर ‘उटा’चे अध्यक्ष प्रकाश वेळीप, आमदार आंतोनियो वाझ, आदिवासी महामंडळाचे अध्यक्ष वासुदेव गावकर, शिक्षण उपसंचालक डॉ. उदय गावकर, दुर्गादास गावडे व इतर उपस्थित होते.

गावडे म्हणाले, आमच्यात जर दुफळी नसती तर आम्ही कधीच भरारी मारली असती. आम्ही संकुचित वृत्ती सोडून दिली पाहिजे. अन्यायाविरुद्ध पेटून उठले पाहिजे. भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या घटनेचा आधार घेत आम्ही पावले टाकणे गरजेचे आहे.

आमदार आंतोनियो वाझ म्हणाले, आदिवासी समाजाने एकत्र येत समाजाप्रती काम करणे गरजेचे आहे. यावेळी बेतू कुळेकर, महादेव कुट्टीकर, शांताराम कुंकळकर, जयंत धुळापकर यांचा समाजाप्रती केलेल्या कार्याबद्दल सत्कार करण्यात आला.

आजही समाजावर अन्याय

आदिवासी समाज हा निसर्गाचा भक्त आहे. तो पर्यावरण रक्षक आहे, याचा आम्ही अभिमान बाळगला पाहिजे. परंतु मणिपूरमध्ये आदिवासी महिलांवर झालेला अत्याचार दुर्दैवी आहे. अशा प्रकारच्या घटनांमधून आदिवासींवर आजही अन्याय होत असल्याचे दिसून येत असल्याची खंत प्रकाश वेळीप यांनी व्यक्त केली.

डॉ. काशिनाथ जल्मी हे एक महान विद्वान होते. ते विधानसभा गाजवत असत. त्यांच्याएवढा बुद्धिमान राजकारणी गोव्यात झाला नाही. ते सदोदित म्हणायचे की, राजकारण आणि समाजकारण एका नाण्याच्या दोन बाजू आहेत. डॉ. जल्मींनी आदिवासींना आत्मविश्‍वास दिला त्यामुळे त्यांचे स्मारक होणे गरजेचे आहे. - प्रकाश वेळीप, ‘उटा’चे अध्यक्ष

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Krittika Nakshatra: गोव्यात कृत्तिका पूजन का करतात? जाणून घ्या धार्मिक महत्व आणि फायदे

युथ काँग्रेसची म्हार्दोळ पोलिस ठाण्यावर धडक, Cash For Job प्रकरणी आक्रमक; मुख्यमंत्र्यांच्या राजीनाम्याची मागणी!

Goa Today's News Live: पाणी जपून वापरा; संपूर्ण बार्देश तालुक्यात दोन दिवस मर्यादीत पाणी पुरवठा

Raechelle Banno: 'IFFI ला माझ्या चित्रपटाने सुरुवात झाली हे पाहून आनंद झाला'; बेटर मॅनच्या अभिनेत्रीने भूमिकेच्या दबावाबद्द्ल मांडले मत

Saint Francis Xavier Exposition: वाजत गाजत निघाली गोंयचो सायबाची मिरवणूक; पहिल्या सोहळ्याचे खास Video पाहा

SCROLL FOR NEXT