Goa Police: कळंगुटमधील पबमध्ये महिलेशी गैरवर्तन करणे, भारतीय पोलिस सेवेतील अधिकारी (आयपीएस) पोलिस उपमहानिरीक्षक डॉ. ए. कोन यांना चांगलेच भोवले आहे.
समाजमाध्यमे आणि विधानसभेत हा विषय उपस्थित झाल्यानंतर डॉ. कोन यांच्याकडील पोलिस उपमहानिरीक्षकपदाचा ताबा काढून घेण्यात येत असून ते पोलिस महासंचालकांकडे तत्काळ हजेरी लावतील, असा दोन ओळींचा आदेश अवर सचिव (कार्मिक दोन) नाथिन आरावजो यांनी जारी केला आहे.
विधानसभेत आमदार विजय सरदेसाई यांनी हा विषय उपस्थित केल्यावर मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी कडक कारवाईचे आश्वासन दिले होते. विधानसभा कामकाजास सुरुवात झाल्यानंतर सरदेसाई यांनी हा विषय उपस्थित केला. आयपीएस अधिकाऱ्याने महिलेशी गैरवर्तन करणे, ही गंभीर बाब आहे.
महिलांच्या सुरक्षिततेची जबाबदारी पोलिसांवर असताना त्यांनी असे वागणे स्वीकारार्ह नाही. हे आयपीएस अधिकारी मौजमजा करण्यासाठी गोव्यात येतात. त्यांना सरकारने पाठीशी घालू नये. त्यानंतर महिला पोलिस ठाण्यासंदर्भातील लक्षवेधी सूचनेवर बोलतानाही त्यांनी हा विषय मांडला.
पोलिस अधिकारी महिलेला चिठ्ठी देतात. त्यात अमुक खोली क्रमांकमध्ये भेट, असे लिहितात आणि कानफटीत खातात. विधानसभेत हा प्रश्न उपस्थित झाला. त्यानंतर ही कारवाई झाली आहे. या प्रकरणी खात्यांतर्गत चौकशी सुरू होती.
तोवर या अधिकाऱ्याला जबाबदारीतून मुक्त करण्यात आले नव्हते. आता या घटनेची माहिती राज्य सरकारने केंद्रीय गृह मंत्रालयाला कळवली आहे. त्यामुळे डॉ. कोन केवळ बदलीवर वाचण्याची शक्यता आहे.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.