Panjim Traffic Jam Dainik Gomantak
गोवा

Rama Kankonkar Assault: रामा काणकोणकर मारहाण प्रकरणी आंदोलक आक्रमक, अडवली दयानंद बांदोडकर रोडवरील वाहतूक; मांडवी पुलाजवळही वाहतूक ठप्प

Panjim Traffic Jam: आंदोलनकर्त्यांनी पणजीतील (Panaji) महत्त्वाचा रस्ता असलेल्या दयानंद बांदोडकर रोडवरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली.

Manish Jadhav

पणजी: गोव्यातील सामाजिक कार्यकर्ते रामा काणकोणकर यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याच्या निषेधार्थ राज्यातील राजकीय पुढारी, सामाजिक कार्यकर्ते आणि हजारो नागरिकांनी शुक्रवारी (19 सप्टेंबर) पणजी शहरात जोरदार आंदोलन केले. या आंदोलनामुळे शहराच्या मुख्य रस्त्यांवर 'रास्ता रोको' करण्यात आला, परिणामी संपूर्ण पणजी शहर आणि परिसर वाहतूक कोंडीत अडकला.

दरम्यान, ही धक्कादायक घटना गुरुवारी (18 सप्टेंबर) दुपारी घडली. या हल्ल्यातील पाच आरोपींना पोलिसांनी अटक केली असली, तरी या प्रकरणाची गांभीर्याने दखल घेऊन दोषींवर कठोर कारवाई करावी आणि अशा घटना पुन्हा घडू नयेत, यासाठी सरकारने ठोस पावले उचलावीत, अशी मागणी यावेळी आंदोलनकर्त्यांनी केली.

मांडवी पुलाजवळ वाहतूक ठप्प

आंदोलनकर्त्यांनी पणजीतील (Panaji) महत्त्वाचा रस्ता असलेल्या दयानंद बांदोडकर रोडवरील वाहतूक पूर्णपणे रोखून धरली. विशेषतः मांडवी पुलाजवळ मोठ्या संख्येने लोक रस्त्यावर बसले, ज्यामुळे वाहतूक कोंडी झाली. अनेक नागरिक आणि पर्यटक या वाहतूक कोंडीत अडकून पडले आहेत. आंदोलकांनी स्मार्ट सिटीचे रस्ते रोखले, ज्यामुळे जनता, पर्यटक आणि प्रवाशांची गैरसोय झाली.

मुख्यमंत्र्यांच्या भेटीची मागणी

आंदोलनकर्त्यांनी मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांना भेटण्याची मागणी केली आहे. 'जोपर्यंत मुख्यमंत्री स्वतः येऊन आमच्या मागण्या ऐकत नाहीत आणि ठोस आश्वासन देत नाहीत, तोपर्यंत आम्ही येथून हटणार नाही,' अशी ठाम भूमिका आंदोलकांनी घेतली आहे. पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला आहे. पोलीस आंदोलनकर्त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करत असून पर्यायी मार्गांनी वाहतूक सुरळीत ठेवण्याचा प्रयत्न करत आहेत.

हा हल्ला केवळ रामा काणकोणकर यांच्यावर झालेला नाही, तर गोव्यातील (Goa) सामाजिक कार्यकर्त्यांवर आणि लोकशाही मूल्यांवर झालेला हल्ला आहे, अशी भावना आंदोलकांनी व्यक्त केली आहे. जर सामाजिक कार्यकर्त्यांना त्यांच्या कामामुळे अशा प्रकारच्या हल्ल्यांना तोंड द्यावे लागत असेल, तर लोकशाहीला मोठा धोका निर्माण होईल, अशी भीतीही त्यांनी व्यक्त केली.

सरकारने या प्रकरणाला गांभीर्याने घेऊन तात्काळ सर्व आरोपींना अटक करुन त्यांच्यावर जलद गतीने खटला चालवावा, अशी त्यांची मुख्य मागणी आहे. या रास्ता रोकोमुळे पणजी शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून नागरिकांनी आणि प्रशासनाने आता या घटनेकडे गांभीर्याने पाहणे आवश्यक आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Crime: गोव्यात मणिपूरच्या 28 वर्षीय तरुणाचा संशयास्पद मृत्यू, भाड्याच्या खोलीत आढळला बेशुद्धावस्थेत; पोलिसांकडून तपास सुरु

चांदीच्या जोडव्यांसाठी 65 वर्षीय महिलेचे कापले पाय, पोलिसांनी आरोपींना ठोकल्या बेड्या; राजस्थानातील थरकाप उडवणारी घटना VIDEO

Horoscope: नशीब चमकणार! 'कर्क-मिथुन'सह 4 राशींना मिळणार दुप्पट लाभ, पाहा तुमची रास आहे का?

India Afghanistan Relations: भारतीयांसाठी अफगाणिस्तानचे दार खुले, तालिबानी नेत्यानं दिली ऑफर; पाकिस्तानातील दहशतवादावरही स्पष्ट केली भूमिका VIDEO

सूर्यकुमार यादवला धक्का! मुंबई संघातून पत्ता कट, नेतृत्वाची कमान 'या' खेळाडूच्या हाती

SCROLL FOR NEXT