MLA Viresh Borkar Dainik Gomantak
गोवा

Viresh Borkar: पंधरा तासानंतर आमदार बोरकरांचे आंदोलन मागे; उपजिल्हाधिकाऱ्यांनी काय दिले आश्वासन?

MLA Viresh Borkar: डोंगरकापणी आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे देत नसल्याच्या कारणास्तव सुरु होते आंदोलन

Ganeshprasad Gogate

MLA Viresh Borkar: काल म्हणजेच शुक्रवारी दुपारपासून आमदार विरेश बोरकर आणि त्यांच्या कार्यकर्त्यांनी पणजीच्या नगर नियोजन कार्यालयात सुरू केलेले धरणे आंदोलन अखेर आज शनिवारी पहाटे 2 वाजता मागे घेतले.

15 तासांनंतर उपजिल्हाधिकाऱ्यांनी आमदार बोरकर यांना यांना सोमवार पर्यंत त्यांच्या सर्व तक्रारींची उत्तरे त्यांना देण्यात येतील असे आश्वासन दिल्याने हे आंदोलन थांबवण्यात आल्याचे प्राथमिक वृत्त हाती आले आहे.

दरम्यान काल शुक्रवारपासूनआमदार विरेश बोरकर आणि यांच्या कार्यकर्त्यांनी सांत आंद्रे मतदारसंघातील डोंगरकापणी आणि बेकायदेशीर बांधकाम प्रकल्पांची कागदपत्रे देत नसल्याच्या कारणावरून पणजीच्या नगर नियोजन कार्यालयात ठिय्या आंदोलन सुरु केले होते.

जोपर्यंत आम्हाला उत्तरांची कागदपत्रे मिळत नाही तोपर्यंत कार्यालयातून उठणार नाही, असा पवित्रा आमदार बोरकर यांनी घेतला होता.

TCP Office

यावेळी त्यांच्या सोबत जवळपास 70 कार्यकर्ते होते. कोणताही अनुचित प्रकार होऊ नये यासाठी खबरदारीचा उपाय म्हणून उत्तर गोवा पोलीस अधीक्षकांनी सर्वांना कार्यालयात गर्दी न करता तळमजल्यावर राहायला सांगितले.

त्यामुळे आमदार बोरकर यांच्यासह 4 सदस्य कार्यालयात ठिय्या मांडून बसले तर इतर कार्याकर्ते बिल्डिंगच्या तळमजल्यावर तळ ठोकून बसले.

निगरनियोजन खाते बिनकामाचे असून, राज्यातील हे एकमेव खाते आहे तिथून काहीच प्रतिक्रिया येत नाही.

गेल्या दोन वर्षात नगरनियोजन खात्याशी निगडीत जवळपास 8 ते 10 तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत. पण अद्याप याबाबत एकही उत्तर खात्याकडून मिळालेले नसल्यानेच मी हे पाऊल उचलल्याचे बोरकर यावेळी म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa FDA Raid: पर्यटकांना बनवलं बनावट ग्राहक! कळंगुट-म्हापशात निकृष्ट दर्जाचे काजू, चॉकलेट जप्त; एफडीएची मोठी कारवाई

Papmochani Ekadashi 2026: नशिबाची साथ अन् श्रीहरीचा आशीर्वाद! पापमोचनी एकादशीला उजळणार 'या' 5 राशींचं भाग्य; नोकरीत बढतीसह धनलाभाचा योग

Crime News: क्रूरतेचा कळस! दहावीच्या विद्यार्थिनीवर 5 नराधमांचा सामूहिक अत्याचार; आई लेकीला वाचवण्यासाठी धावली, पण...

मस्करीची झाली कुस्करी! बॉसला एका शब्दासाठी मोजावे लागले 29 लाख, महिला कर्मचाऱ्याला चिडवणं पडलं महागात; काय नेमकं प्रकरण?

Goa Drugs Case: अंमली पदार्थांविरोधात फातोर्डा पोलिसांचा 'ॲक्शन मोड'! 'इतक्या' हजारांच्या गांजा जप्त; 25 वर्षीय तरुणाच्या आवळल्या मुसक्या

SCROLL FOR NEXT