Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

पणजीतील MG रोड बंद होणार, वाहतूक '18 जून'ने वळवणार; MD नी सांगितली Smart City च्या कामांची स्थिती

Panjim Smart City: मुख्यमंत्र्यांनी दिलेली डेडलाइन पूर्ण करू - संजित रॉड्रिग्स, MD Smart City

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: गेल्या दोन आठवड्यापासून स्मार्ट सिटीच्या कामाबाबत बऱ्याच घडामोडी घडल्या. स्मार्ट सिटीच्या कामाबाबत होणारी दिरंगाई, त्यावरून उत्पल पर्रीकर आणि पणजीचे आमदार बाबूश मोन्सेरात यांच्यात झालेली खडाजंगी या सर्व घटनांनंतर आता स्मार्ट सिटीचे MD संजित रॉड्रिग्स यांनी या प्रकल्पाच्या आतापर्यंत कामाबाबत माहिती दिलीय.

संजीत रॉड्रिग्स यांनी दिलेल्या माहितीनुसार, ''पणजी शहरातील 7000 मीटर रस्त्यांची दुरुस्ती करणे बाकी आहे तर 580 मीटर रस्त्यांचे काम पूर्ण झाले आहे.

याशिवाय 500 मीटर रस्त्यांचे काम चालू आहे. रस्त्यांच्या उभारण्याअगोदर शहरातील सांडपाण्याच्या पाईपलाईन टाकण्याचे काम सुरु असल्यानेच रस्त्याची कामे संथ गतीने सुरू'' असल्याची माहिती त्यांनी दिली.

त्याशिवाय 'मलनिस्सारणाचे काम संथगतीने का सुरू आहे याची देखील चौकशी करू तसेच अन्य ठिकाणची कामे पूर्ण करण्यासाठीची मुदत निश्चित करण्यात येईल' असेही त्यांनी सांगितले.

तसेच राजधानी पणजीतील महत्वाचा असलेला 18 जून रोड आणि एमजी रोडवर सांडपाण्याची पाईपलाईन टाकण्याचे काम लवकरच सुरु करण्यात येणार आहे.

''या मार्गांवर सीवेज कनेक्शन टाकणे हे आमच्यासाठी आव्हान असून याकामासाठी संपूर्ण एमजी रोड बंद ठेवण्यात येईल आणि तेथील वाहतूक 18 जून रोडने वळवली जाईल.

कामात सुसूत्रता असावी आणि काम जलदगतीने व्हावे यासाठी प्रत्येक कामांना आम्ही मायक्रो डेडलाइन दिली आहे. आम्ही या सर्व डेडलाइन पूर्ण करूच आणि मुख्यमंत्र्यांनी दिलेली 31 मेची डेडलाइन पूर्ण करण्याचा प्रयत्न करू,'' अशी माहिती स्मार्ट सिटीचे MD संजित रॉड्रिग्स यांनी दिलीय.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Sporting Club Goa: दीपांकुर शर्मा यांच्या खांद्यावर मोठी जबाबदारी; आय-लीग 2 मध्ये दमदार कामगिरीचे लक्ष्य

Goa Research: त्वचेच्या उपचारात 3D तंत्रज्ञानाची नवी झेप! स्वस्त आणि सुरक्षित जलजेल विकसित

Colvale Central Jail: कोलवाळ कारागृहात वाईननिर्मितीचा आरोप; प्रशासनाचा स्पष्ट इन्कार, 'सुरक्षा कडक केल्याने नाराजांचे षड्‌यंत्र'

Illegal Hill Cutting Case: 4 वर्षांच्या लढ्याला अखेर यश! हडफडेची बेकायदा कापलेली टेकडी पूर्ववत; हायकोर्टानं प्रकरण काढलं निकाली

Toxic Movie Release: 'टॉक्सिक'चा धमाका! रॉकस्टार यशची रुपेरी पडद्यावर धमाकेदार एन्ट्री; थिएटर्सबाहेर चाहत्यांची तोबा गर्दी VIDEO

SCROLL FOR NEXT