Panjim Smart City Dainik Gomantak
गोवा

Panjim Smart City: स्मार्ट सिटीच्या 'त्या' योजनेमुळे खाजगी बसमालक संंकटात? संघटनेने मुख्यमंत्र्यांवर केले आरोप..

Panjim Smart City: स्मार्ट सिटी प्रकल्पातून व्यवसायावर संकट

Ganeshprasad Gogate

Panjim Smart City: पणजी कदंब ट्रान्सपोर्ट कॉर्पोरेशन लिमिटेड केटीसीएलच्या मालकीच्या मोठ्या आणि मिनी बसेससह इलेक्ट्रिकल बस, बिगर मोटार चालवलेल्या रस्त्यांवरील इलेक्ट्रिकल बग्गी इत्यादींसह 60 नवीन बसेसचा ताफा पणजी आणि आजूबाजूच्या परिसरात धावणाऱ्या खासगी बसेसच्या जागी स्मार्ट सिटी प्रकल्पाखाली धावणार सल्ल्याची माहिती सरकारकडून जारी केली आहे.

यावर आता खाजगी बसचालक संघटनेने आता या सर्व प्रक्रियेवर आक्षेप घेतला आहे.

स्मार्ट सिटी च्या नावाखाली खाजगी बसमालकांचा व्यवसाय बंद करण्याचा प्रयत्न करीत असल्याचा आरोप खाजगी बसचालक संघटनेचे अध्यक्ष सुदिप ताम्हणकर यांनी केला आहे.

मुख्यमंत्र्यांनी दिलेले बसमालकांना आश्वासन विसरून कुणालाच विश्वासात न घेता विद्युत बसेस पणजी सुरू करण्याचा आदेश जारी केला असल्याचे सुदिप ताम्हणकर यांनी पत्रकार परिषदेत सांगितले

स्मार्ट सिटी प्रकल्पाअंतर्गत पणजी बस स्टँड ते मिरामार, दोनापावला, करंझाळे, बांबोळी गोवा विद्यापीठ, कुजिरा, ताळगाव, सांतिनेज, सांताक्रुझ आणि अल्तिनो या मार्गांवर बसेस धावणार असल्याची माहिती मिळाली आहे.

या मार्गांवर कदंबने सुरू केलेल्या स्मार्ट बसेस मार्गानुसार कलर कोड केलेल्या असतील आणि त्या क्यूआर कोड तिकीट सारख्या सेवा देतील. प्रवाशांकडून १० रुपये आणि २० रुपये भाडे आकारण्याचा प्रस्ताव आहे, असे अधिसूचनेत नमूद केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: 'ऑर्डर उशिरा का आणली?' म्हणत डिलिव्हरी बॉयला फ्लॅटमध्ये खेचून मारहाण, तीन मिनिटांचा CCTV व्हिडिओ व्हायरल

8th Pay Commission: केंद्रीय कर्मचाऱ्यांसाठी मोठी बातमी! पगार किती वाढणार? फिटमेंट फॅक्टर किती असेल? 5 महत्त्वाचे अपडेट्स आले समोर

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

SCROLL FOR NEXT