Goa Municipality Dainik Gomantak
गोवा

Goa Municipality: नव्या इमारतीसाठी महापालिकेचा जुन्या बांधकामांवर हातोडा

Goa News: पहिल्या टप्प्यात 11 कोटींचे इमारतीचे काम करण्याचे महापालिकेने मनावर घेतले आहे.

दैनिक गोमन्तक

Goa Municipality: महापालिकेने आपल्या इमारतीलगत असलेल्या मार्केटच्या इमारतीवरील पत्रे आणि इतर साहित्य हटविण्यास शुक्रवारपासून सुरुवात केली आहे. प्रत्यक्षात पक्के बांधकाम हटविण्याचे काम जेसीबीच्या साह्याने पुढील आठवड्यात सुरु होईल, असे महापालिकेच्या अधिकाऱ्यांनी सांगितले.

पहिल्या टप्प्यात 11 कोटींचे इमारतीचे काम करण्याचे महापालिकेने मनावर घेतले आहे. त्यानुसार गोवा राज्य नगर नियोजन खात्याच्या वतीने हे काम मार्गी लागले असल्याने जुन्या बीएसएनएलच्या कार्यालयाच्या जागी ही इमारत उभारली जाणार आहे.

पार्किंगसह महापालिकेचे कार्यालय या ठिकाणी असेल. त्यानंतर महापालिकेची सध्याची इमारत आणि बाजूच्या भागात टप्प्याटप्प्याने इमारतीची उभारणी केली जाणार आहे. या इमारतीचे बांधकाम खरेतर आजच जेसीबीच्या साह्याने हटविले जाणार होते.

परंतु संबंधित कंत्राटदाराचा जेसीबी उपलब्ध होऊ शकला नसल्याने पक्के बांधकाम हटविण्यास सुरुवात झाली नाही. यू आकाराच्या या इमारतीचा एक भाग हटविला जाणार असून, त्या ठिकाणी नवी इमारत उभारली जाईल.

वैशिष्ट्यपूर्ण नोंद

या नव्या इमारतीचा विषय खऱ्या अर्थाने सध्याचे नगरसेवक सुरेंद्र फुर्तादो हे महापौर असताना मंजूर झाला होता. तेव्हा मनोहर पर्रीकर यांनी या इमारतीला लागणाऱ्या निधीविषयी फुर्तादो यांना आश्‍वासन दिले होते. पण ते काम या ना त्या कारणाने रेंगाळत राहिले. आता बाबूश मोन्सेरात आमदार आणि त्यांचे पुत्र रोहित मोन्सेरात यांच्या काळात ही इमारत उभारली जात असल्याने ही नोंदही वैशिष्ट्यपूर्ण असेल.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kalidasa Pride Story: महाकवी कालिदासाचा गर्व उतरला, आजच्या साहित्यिकांचा कधी? पुरस्कार, सत्कार अन् अहंकारावर परखड भाष्य

PM Kisan 24th Installment: दिवाळीपूर्वी शेतकऱ्यांना मोठं गिफ्ट? पीएम किसानचा 24वा हप्ता 'या' दिवशी जमा होणार; पाहा काय आहे अपडेट

VIDEO: समुद्रात तरंगू लागले आयफोन अन् लक्झरी परफ्यूमचे बॉक्सेस! होर्मुझ सामुद्रधुनीत भीषण अपघात; जहाजावरील 21 जणांचा जीव थोडक्यात वाचला

DA Hike: कॅबिनेट बैठकीत DA बाबत मौन! केंद्रीय कर्मचाऱ्यांना आता दिवाळीची प्रतीक्षा; महागाई भत्त्यावर अजूनही सस्पेन्स कायम

Pakistan School Tragedy: निष्पाप चिमुकल्यांचा टाहो! पाकिस्तानात शाळेचे छत कोसळून 20 हून अधिक मुलांचा मृत्यू; हॉस्पिटलबाहेर पालकांचा हंबरडा

SCROLL FOR NEXT