Panjim Municipal Corporation Dainik Gomantak
गोवा

Panjim Municipal Corporation: महानगरपालिकेचा 'तो' दावा फोल; मात्र उपमहापौर म्हणतात, 'पहिल्या पावसाने...

गटारे तुंबल्याच्या तक्रारीनंतर गटारांची सफाई करण्याचे काम महानगरपालिकेद्वारे सुरू

गोमन्तक डिजिटल टीम

Panjim Municipal Corporation पावसाळा सुरू झाल्याने राजधानीत अनेक ठिकाणी गटारे तुंबण्याचे प्रकार घडत आहेत. त्यामुळे गटारे तुंबल्याच्या आलेल्या तक्रारीनंतर गटारांची सफाई करण्याचे काम सध्या महानगरपालिकेद्वारे सुरू आहे.

मात्र, गटारांची शंभर टक्के सफाई केल्याचा दावा महानगरपालिका आजही करीत आहे. महानगरपालिकेने गटारांची साफसफाई झाल्याचे सांगितले गेले असले तरी अनेक ठिकाणी गटारांची सफाई झाली का? असा प्रश्‍न उपस्थित होतो.

शहरातील मांडवी कॉर्नरजवळील तनिष्क शोरूमसमोर गटार भरले असून, त्यातून घाण पाणी वर येत आहे, तरीही त्याकडे कोणाचे लक्ष नसल्याचे दिसून आले. याच ठिकाणी काही दिवसांपूर्वी सरकारी शाळेसमोरील गटाराची सफाई करण्यात आली होती.

महानगरपालिकेने शंभर टक्के गटारांची सफाई झाल्याचा दावा केला आहे. याविषयी उपमहापौर संजीव नाईक म्हणतात, पहिल्या पावसाने गटारातूंन वाहून आलेल्या कचऱ्यामुळे 18 जून मार्गावरील गटार तुंबले आणि पाणी साचण्याचा प्रकार घडला.

आता आम्ही पुन्हा एकदा गटारांची म्हणजे कचरा साचलेल्या ठिकाणांची सफाई करण्याचे काम सुरू केले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Asian Games Semifinal 2026: श्रीलंकेविरुद्ध ईशान ठरला हिरो! तुफानी फटकेबाजीनं मोडला 8 वर्ष जुना रेकॉर्ड; आता फायनलमध्ये पाकिस्तानी गोलंदाजीची काढणार पिसं

Small Savings Scheme: कोट्यवधी गुंतवणूकदारांसाठी खूशखबर! PPF आणि सुकन्या समृद्धी योजनेबाबत सरकारचा मोठा निर्णय; तुमच्या पैशांवर मिळणार भरघोस परतावा

Asian Games Semifinal 2026: हाय-होल्टेज सामन्यात भारतानं उडवली पाकड्यांची दाणादाण, अभिषेकचा जादुई गोल ठरला निर्णायक; टीम इंडियाची फायनलमध्ये धडक

Ruhani Sharma: विराट कोहली माझे जीजू... अनुष्काच्या कुटुंबाशी संबंधित मोठा दावा! अभिनेत्री रूहानी शर्मा पुन्हा चर्चेत, नेमकं काय आहे कनेक्शन?

Ranji Trophy: पर्वरी मैदानाच्या नूतनीकरणाचा परिणाम; गोव्याचा तिसरा रणजी सामनाही पणजी जिमखान्यावर

SCROLL FOR NEXT