Yog Setu In Panjim Dainik Gomantak
गोवा

Yog Setu In Panjim: पर्यावरणीय अभ्यासाविना पुलाची उभारणी कशी केली? एनजीटीचा आक्षेप

गोमन्तक डिजिटल टीम

Yog Setu In Panjim सांतिनेज खाडीवर म्हणजे मांडवी नदीला खाडी जोडली गेली आहे, त्याठिकाणी (जुन्या गोमेकॉ इमारतीसमोर) वॉक-वेसाठी नव्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे.

त्या पुलाबाबत हरित लवादाने प्रश्‍न उपस्थित केला आहे. पर्यावरणीय अभ्यास न करता पुलाची उभारणी कशी काय करण्यात आली, असा सवाल लवादाने केला आहे.

पदपथ तथा सायकल ट्रॅकसाठी या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. ज्या ठिकाणी हा पूल उभारण्यात आला आहे, ते क्षेत्र पर्यावरण संवेदनशील आहे. माजी नगरसेविका पॅट्रासिया पिंटो यांनी हरित लवादाकडे या कामाबाबत धाव घेतली होती.

गोवा राज्य साधनसुविधा विकास महामंडळातर्फे हे सुशोभीकरणाचे काम केले आहे. गोवा किनारा संरक्षण व्यवस्थापन प्राधिकरणाने या कामाला कशी परवानगी दिली होती, याबावरही एनजीटीने आक्षेप नोंदविला आहे.

पर्यावरणीय प्रभाव मूल्यांकन (ईआयए) अभ्यासाची काहीही गरज नव्हती; कारण हा प्रकल्प बी-2 वर्गातील असून, तो ईआयए अधिसूचना 2006 अन्वये राबविला जात आहे, असे जीएसआयडीसीने एनजीटीला सांगितले आहे. यापुढील सुनावणी 21 नोव्हेंबरला होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Arjun Tendulkar: क्रिकेटच्या देवाचा मुलगा चमकला, कर्नाटक संघाचे कंबरडे मोडले; गोव्याला मिळवून दिला मोठा विजय

Hit and Run Case: पेडणे हिट अँड रन प्रकरणातील फरार ट्रकचालकाला अटक

Mumbai Goa Highway Accident: मालवणमधून कोल्हापूर - तुळजापूरला जाणाऱ्या एसटी बसचा अपघात, 26 प्रवासी जखमी

Whirlwind at Arambol Beach: हरमल समुद्रकिनारी अचानक वावटळीची धडक; काही स्टॉल्सचे नुकसान

Goa Fishing: कर्नाटकातील मच्छीमारांची घुसखोरी, गोव्यातून होतोय तीव्र विरोध

SCROLL FOR NEXT