Kakan Railway: कोकण रेल्वे मार्गावर यावर्षी आतापर्यंत कोकण आणि गोव्यासाठी सोडलेल्या गणपती विशेष गाड्यांची संख्या 2021 मध्ये कोरोनाची साथ असताना सोडलेल्या गाड्यांपेक्षा कमी आहे. 12 आणि 8 डब्यांच्या मेमू गाड्या सोडल्यामुळे त्यांची प्रवासी क्षमताही कमी आहे.
त्यामुळे 15 ते 19 सप्टेंबर आणि 23 ते 26 सप्टेंबरदरम्यान आणखी विशेष गाड्या सोडण्याची गरज निर्माण झाली आहे. सध्या या सर्व गाड्यांची आरक्षणे पूर्ण झाली असून प्रतीक्षा यादीही प्रत्येक वर्गामागे 250 च्यावर गेली आहे.
गणेश चतुर्थीच्या निमित्ताने कोकण आणि गोव्यात मुंबईतून येणाऱ्या प्रवाशांची संख्या मोठी असते. यासाठी विशेष गाड्या सोडण्यात येतात. त्याशिवाय असलेल्या गाड्यांच्या डब्यांची संख्या वाढवण्यात येत असे.
यंदा तसा निर्णय अद्याप घेण्यात न आल्याने प्रवासी आपल्या सणावाराला गावी जाता येईल की नाही याविषयी साशंक आहेत. प्रवाशांनी ०११५५/०११५६ दिवा-चिपळूण-दिवा व ०११५३/०११५४ दिवा-रत्नागिरी-दिवा या मेमू विशेष गाड्या प्रत्येकी किमान १६ डब्यांनी चालवणे आवश्यक असल्याचे मत समाजमाध्यमावर व्यक्त करणे सुरू केले आहे.
उत्तरेतून दक्षिणेकडे जाणाऱ्या-येणाऱ्या गाड्या महाराष्ट्रात केवळ वसई, पनवेल व रत्नागिरी येथे थांबतात. त्यामुळे त्यांचे आरक्षण अजूनही उपलब्ध आहे.
त्यामुळे, या सर्व गाड्यांना माणगाव, वीर, खेड, संगमेश्वर, आडवली, विलवडे, राजापूर, वैभववाडी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी तालुक्यांत आलटून पालटून तात्पुरते थांबे दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे. त्याशिवाय राज्यात मडगाव वगळता थिवी आणि काणकोण रेल्वे स्थानकांवर या गाड्यांना थांंबे दिल्यास प्रवाशांना दिलासा मिळू शकणार आहे.
या सुधारणा करण्याची गरज
तुतारी एक्सप्रेस, जनशताब्दी एक्सप्रेस, मुंबई-मंगळुरू एक्सप्रेस, तेजस एक्सप्रेस, नागपूर-मडगाव एक्सप्रेसला डबे जोडण्यात यावेत.
१ संपूर्ण वातानुकूलित गाडी दररोज सोडण्यात यावी.
दक्षिणेकडे जाणाऱ्या गाड्या अद्याप रिकाम्या आहेत. त्यांना कोकण मार्गावर तात्पुरते थांबे देण्यात यावेत.
कोरोना काळात (२०२१) जितक्या गाड्या सोडल्या होत्या, त्यानंतर गाड्यांची संख्या कमी होत आहे.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.