Mandovi Dainik Gomantak
गोवा

मैं नशे में हूँ! एका बेबद्यामुळे मांडवीवर चक्काजाम; पोलीस, डॉक्टरही आले जेरीस

Mandovi Bridge: वाहतूकीचा खोळंबा; पोलिसांची धावपळ

Ganeshprasad Gogate

Mandovi Bridge: गोव्यात वाहतूक कोंडीची समस्या काही नवीन नाही पण एका झोपलेल्या व्यक्तीमुळे वाहतूक कोंडी झाली असं जर तुम्हाला सांगितलं तर कदाचित तुमचा त्यावर विश्वास बसणार नाही.

पण हो प्रकार घडलाय आणि तोही राजधानी पणजीत. त्याच झालं असं की, आज 24 जानेवारीला दुपारचा सुमारास मांडावी पुलावर दुचाकी पार्क करून मद्यधुंद अवस्थेतील एक महाशय ब्रिजच्या कठड्यानजीक भर उन्हात झोपलेले आढळून आले.

घटनेबद्दल काहीच खुलासा होईना म्हणून जागृत नागरिकांनी पोलीस दलाला आणि रुग्णवाहिकेला पाचारण केलं.

कार्यतत्पर पोलीस आणि रुग्णवाहिका काही अवधीतच घटनास्थळी दाखल झाले. पण तोवर या सर्व प्रकारामुळे मांडावी पुलावर बराच वेळ वाहतूक कोंडी निर्माण झाली होती.

पोलीस कर्मचाऱ्यांनी आणि रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांनी त्या झोपलेल्या महाशयांना उठवण्याचा प्रयत्न केला खरा पण उठवण्यासाठी आलेल्या कर्मचाऱ्यांना शिव्यांची लाखोली वाहत ते महाशय उठण्यास नकार देऊ लागले.

शेवटी पोलिसांनी रुग्णवाहिकेतील कर्मचाऱ्यांच्या मदतीने संबंधित महाशयांना घटनास्थळावरून उठवत वाहतूक सुरळीत करून रस्ता वाहनांसाठी मोकळा केला. या घटनेबद्दल काही काळ चर्चा रंगली होती.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Viral Video: हा आहे खरा 'देसी' जुगाड! 'अल्ट्रा प्रो मॅक्स' व्हिडिओ व्हायरल, तुमच्याही तोंडून निघेल 'काय कल्पना'!

Goa Accident: 'रेंट अ कॅब' थार कारची दुचाकीला धडक; भाऊ-बहीण गंभीर जखमी, कारचालक फरार

Bicholim Online Fraud: 'इन्व्हेस्टमेंट'च्या नावाखाली फसवणूक! लाखोंचा गंडा घालणाऱ्या संशयिताला मध्यप्रदेशातून अटक; डिचोली पोलिसांची मोठी कारवाई

'माझे घर' योजना अडचणीत, उच्च न्यायालयाची गोवा सरकारला 'नोटीस'; उत्तरासाठी 3 फेब्रुवारीपर्यंत मुदत

भारतात क्रिप्टो चलन कोठून आणि कसे खरेदी करावे? संपूर्ण प्रक्रिया, संभाव्य धोके तसेच काय काळजी घ्यावी जाणून घ्या

SCROLL FOR NEXT