Diwali 2023 Dainik Gomantak
गोवा

Diwali 2023: नरकासूरा रे नरकासूरा.... अक्राळविक्राळ नरकासूराचं दहन करण्यास अवघे काही तास बाकी

Ganeshprasad Gogate

Diwali 2023 दिवाळीच्या पूर्व संध्येला गोवेकर नरकासुर स्पर्धेचे दंग असल्याचे चित्र गोव्यातील प्रत्येक गावात दिसत आहे. दिवाळी हा सण तसा देशभरात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. दिवाळीला गोडधोड फराळ करण्याची प्रथा आहे.

महाराष्ट्रात दिवाळी म्हटलं की किल्ले बनवून त्यावर शिवकालीन देखावे उभारले जातात. त्याचप्रमाणे गोव्यात दिवाळीपूर्व नरकासुर दहन (Narkasur In Goa) ही एक मोठी परंपरा आहे. नरकासुराच्या महाकाय प्रतिकृती आणि जल्लोषात निघणारी भव्य मिरवणूक काढून पहाटे नरकासुराचे दहन केले जाते.

गोवा म्हटलं की आपल्याला ख्रिसमस आठवतो. पण इथल्या दिवाळीचं एक वेगळेपण आहे. उत्तर भारतात दसऱ्याला जसं रावण दहन असतं, त्याचधर्तीवर गोव्यात नरकासुराचं दहन केलं जातं. गोव्यात दिवाळीचा दिवस म्हणजे 'नरक चतुर्दशी'. या दिवशी नरकासुराची काढली जाणारी मिरवणूक आणि त्यानंतर होणारं त्याचं दहन हा मोठा आकर्षणाचा भाग होऊ लागला आहे.

गोव्यात घराघरात नरक चतुर्दशी पारंपरिक पद्धतीनं साजरी होते. पण गेल्या काही वर्षांत 'नरकासुरानं' या दिवसाला एक वेगळंपण दिलं आहे. इथल्या गावोगावी प्रत्येक चौकात भलेमोठे नरकासूर दिसतात. त्यांची वाजत गाजत मिरवणूक काढली जाते.

युवा पिढीवर नरकासूर बनवण्याचा वाढता प्रभाव बघून अनेक राजकीय नेतेसुद्धा आता त्यांना आर्थिक सहाय्य देऊ लागले आहेत. त्यामुळं प्रायोजित नरकासुरांची संख्या दिवसेंदिवस वाढू लागली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IIT चा माजी विद्यार्थी 700 कोटींची गुंतवणूक करणार; गोव्यात धावणार आणखी EV बसेस, मंत्रिमंडळाची मंजुरी

GPSC परीक्षा म्हणजे काय रे भाऊ? 50 टक्के विद्यार्थ्यांना नाही माहिती, Goa University च्या कामगिरीवर मुख्यमंत्री नाराज

पोटच्या मुलीवर लैंगिक अत्याचार, बापाची बाल न्यायालयाने केली निर्दोष मुक्तता; हायकोर्टाने रद्द केला आदेश

Waqf Amendment Bill 2024: वक्फ बोर्ड कायदा प्रस्तावित दुरुस्तीवरून गोंधळ सुरुच, जाणून घ्या काय आहे संपूर्ण प्रकरण

ED Raid: फ्लॅट्सच्या नावाखाली 636 कोटींची फसवणूक; मेरठमधील व्यावसायिकाच्या दिल्ली, गोव्यातील मालमत्तेवर छापे

SCROLL FOR NEXT