panchyat Election
panchyat Election Dainik Gomantak
गोवा

Goa panchyat Election 2022: सर्वात ज्येष्ठ विजयी उमेदवारास मुख्यमंत्र्यांनी दिल्या शुभेच्छा

Sumit Tambekar

मये मतदार संघातील ग्रामपंचायतीसाठी 82 वर्षीय एका व्यक्तीने आपला उमेदवारी अर्ज दाखल केला होता. भागो वरक नामक या व्यक्तीने भाजपमार्फत आपला अर्ज भरला अन् नेटाने निवडणूक लढली. केवळ लढली नाही ते निवडून ही आले आहेत. या निमित्ताने राज्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी याबाबत वरक यांचे विशेष कौतूक करत त्यांचे अभिनंदन केले आहे.

(Goa Panchyat Election 2022: Chief Minister Pramed Sawant congratulates 82-year-old Bhago Varak)

हर घर तिरंगा या कार्यक्रमाच्या निमित्ताने मुख्यमंत्री आले असता यावेळी मूख्यमंत्री म्हणाले की, या वयात वरक यांची समाजाची सेवा करण्याची तयारी आपल्याला खुप काही शिकवणारी आहे. भारतीय जनता पक्षाचे ते वैशिष्ट्य आहे की, सामान्य कार्यकर्त्याला कायम संधी दिली जाते त्याप्रमाणे यावेळी संधी दिली गेली. या संधीचं वरक यांनी सोनं केलं आहे.

मिळालेल्या माहितीनुसार कुडचडे पंचायत क्षेत्रातील मये मतदार संघात असणाऱ्या वार्ड नंबर 6 मधील 82 वर्षीय भागो वरक नामक व्यक्तीने पुन्हा एकदा पंच म्हणून आपला प्रवेश निश्चित केला आहे. वरक यांनी 1998 मध्ये आपली पहिली पहीली विजश्री खेचून आणली होती.

यानंतर आता ते पुन्हा पंच असणार आहेत. आपण हा लढा केवळ लोकांच्या आग्रहाखातर लढणार आहोत. तसेच वाड्यावरील सुधारणा करण्यासाठी आपण विषेश प्रयत्न करणार असल्याचं ही त्यांनी माध्यमांशी बोलताना सांगितलं आहे.

Goa panchayat Election 2022: दक्षिण गोव्यात सत्ताधाऱ्यांना यश

मडगाव: एक सासष्टी तालुका वगळता दक्षिण गोव्यातील उर्वरित सहा तालुक्यांत सत्ताधारी भाजप आमदारांनी आपली पत राखून ठेवली असून या निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व केवळ सासष्टीतील काही भागापुरते राहिल्याचे दाखवून दिले.

सासष्टी तालुक्यातील ३३ पैकी चांदर, गिरदोळी आणि माखाझन या तीन पंचायतींवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे पॅनल निवडून आले तर वेळ्ळी पंचायतीवर काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांचे पॅनल निवडून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Top News: चोर्ला घाट अपघातात तरुण ठार, कन्‍हैयाकुमार मृत्यूप्रकरणी खूनाचा गुन्हा नोंद; राज्यातील ठळक बातम्या

Goa Education: गोव्यात आता ITI मध्ये करता येणार दोन नवे कोर्स, 15 जुलैपासून सुरुवात; CM नी दिली महत्वाची माहिती

Bicholim News: कारवर कोसळले झाड; बैलासह म्हशीची सुटका

Assagao Demolition: आसगाव प्रकरणात CM आणि लोबो दाम्पत्याचा हस्तक्षेप! वकिलाचा युक्तीवाद, पूजाला जामीन मिळणार का?

Goa News: ...आणि मुख्यमंत्रीही झाले वारकरी !

SCROLL FOR NEXT