तूरडाळ व साखर प्रकरणात नागरी पुरवठा संचालक निलंबित

राज्यात चांगलेच गाजलेल्या प्रकरणात एकावर निलंबनाची कारवाई
turdal and sugar
turdal and sugarDainik Gomantak
Published on
Updated on

गोव्यात 241 टन तूरडाळ सडल्याच्या घटनेनंतर राज्यात 10.3 मेट्रिक टन साखरही खराब झाल्याची घटना समोर आली होती. यामूळे राज्यात सत्ताधाऱ्यांवर विरोधी पक्षांनी वातावरण तापवण्यास सुरुवात केली आहे.

(Civil Supplies Director Siddhivinayak Naik suspended in the case of turdal and sugar)

turdal and sugar
डिचोली येथील सातेरी मंदीर चोरट्यांनी फोडले

गोवा राज्य सरकारने यावर आपण चौकशी समिती नेमत दोषींवर कारवाई करु असे स्पष्टीकरण देताना म्हटले होते. त्यानूसार आज एका नागरी पुरवठाचे संचालकावर निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे. या प्रकरणात तत्कालीन संचालक सिद्धीविनायक नाईक यांच्यावर ही निलंबनाची कारवाई करण्यात आली आहे.

turdal and sugar
School Merger : शाळा खासगीकरणाचा प्रस्ताव नसल्याचा हळर्णकरांचा दावा

सविस्तर वृत्त असे की, गोवा राज्यात 241 टन तूरडाळ व 10.3 मेट्रिक टन साखर खराब झाल्याचा घटना समोर आल्या होत्या. या नासाडीबाबत विरोधी पक्षांनी राज्य सरकारला घेरण्याचा प्रयत्न केला. राष्ट्रीय काँग्रेसने तत्कालीन नागरी पुरवठा मंत्री, अधिकाऱ्यांना जबाबदार असून त्यांना बडतर्फ करा. या प्रकरणाची उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या देखरेखीखाली चौकशी करा अशा मागण्या केल्या आहेत.

राज्य सरकारने याबाबत स्पष्टीकरण देताना आपण तातडीने चौकशी करणार असून जे दोषी असतील त्यांच्यावर निश्चित कारवाई करण्यात येईल अशी ही शाश्वती दिली होती. यानंतर तत्कालीन मंत्र्यांनी या प्रकरणात हात झटकले होते. त्यामूळे तत्कालीन अधिकाऱ्यांवरच कारवाई होणार अशी शक्यता निर्माण झाली होती. त्यानूसार आता पहिल्या व्यक्तीवर कारवाई झाली आहे. त्यामूळे ही करवाई अजून वाढणार का ? हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे.

Goa panchayat Election 2022: दक्षिण गोव्यात सत्ताधाऱ्यांना यश

एक सासष्टी तालुका वगळता दक्षिण गोव्यातील उर्वरित सहा तालुक्यांत सत्ताधारी भाजप आमदारांनी आपली पत राखून ठेवली असून या निवडणुकीने काँग्रेसचे अस्तित्व केवळ सासष्टीतील काही भागापुरते राहिल्याचे दाखवून दिले.

सासष्टी तालुक्यातील ३३ पैकी चांदर, गिरदोळी आणि माखाझन या तीन पंचायतींवर काँग्रेसचे कार्याध्यक्ष व कुंकळ्ळीचे आमदार युरी आलेमाव यांचे पॅनल निवडून आले तर वेळ्ळी पंचायतीवर काँग्रेसचे दक्षिण गोवा अध्यक्ष सावियो डिसिल्वा यांचे पॅनल निवडून आले.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com