Goa Protest News Dainik Gomantak
गोवा

Goa Protest News: गोव्यात 'निर्मल रेसिडेन्‍सी'विरोधात धरणे आंदोलन

Goa Protest News: पंचायत मंडळाने सदर बांधकामाला परवाना देण्यास मान्यता दिल्याने लोकांनी शेल्डे पंचायती जवळ धरणे आंदोलन केले.

दैनिक गोमन्तक

Goa Protest News: तिळामळ-केपे येथील सर्व्हे क्रमांक 25/13 मध्‍ये होऊ घातलेल्या ‘निर्मल रेसिडेन्‍सी’ या निवासी संकुलाच्या कामाला स्थानिक लोकांचा विरोध असताना पंचायत मंडळाने सदर बांधकामाला परवाना देण्यास मान्यता दिल्याने लोकांनी आज शेल्डे पंचायती जवळ धरणे आंदोलन केले.

तिळामळ येथे 2016 साली सर्व नियम धाब्यावर बसवून व लोकांची गेल्या दीडशे वर्षांची पारंपरिक वाट निवासी संकुल बांधणाऱ्या बिल्डरने आपल्या ताब्यात घेतल्याने लोकांनी आवाज उठवून सदर बांधकाम 2020 साली बंद पाडले होते, असे कॉन्सेसाव ओलिव्हेरा यांनी सांगितले.

सदर बांधकाम (Construction) बेकायदेशीररित्या बांधले जात असल्याने लोकांनी या बांधकामाला विरोध केला होता व तेव्हापासून सदर बांधकाम बंद करण्यात आले होते. पण शेल्डे पंचायतीवर नवीन पंचायत मंडळ स्थापन होताच बिल्डरने परत एकदा या बांधकामाची फाईल पंचायत मंडळापुढे आणताच 11 पैकी 10 पंचसदस्‍यांनी बांधकाम परवाना देण्यास मान्यता दिल्याचे ओलिव्हेरा यांनी सांगितले.

नवी मोड्डी येथील सुमारे 80 कुटुंबीयांचा या प्रकल्पाला विरोध आहे व तशी लेखी कागदपतत्रे पंचायतीला यापूर्वीच सादर करण्यात आली होती. पण पंचायत मंडळाने लोकांना विश्वासात न घेता तसेच खास बैठक न बोलावता सदर प्रकल्पाला मान्यता देण्यासाठी 10 पंचसदस्‍यांनी सह्या केल्याने पंचायत मंडळावर लोकांनी प्रश्नचिन्ह निर्माण केले आहे.

फाईलचे गौडबंगाल!

जेव्हा जेव्हा लोकांनी याबाबत तुम्ही काय निर्णय घेतला आहे अशी पंचायतीकडे विचारपूस करण्याचा प्रयत्न केला तेव्हा तेव्हा त्यांना सदर फाईल गहाळ झाली असल्याचे सांगण्यात आले. पण सदर फाईल पंचायत (Panchayat) मंडळाची बैठक होण्याच्या दोन दिवस अगोदर कोठे सापडली हा एक चर्चेचा विषय बनला आहे.

दीप्ती नाईक, सरपंच-

निर्मल रेसिडेन्‍सी प्रकल्‍पाला पंचायतीने अजून परवाना दिलेला नाही. याबाबत योग्य तो निर्णय घेण्‍यात येणार आहे. असले तरी दहा पंचसदस्‍यांनी कोणत्या कारणामुळे पाठिंबा देऊन सह्या मारल्या आहेत ते मात्र कळू शकले नाही.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Porvorim Accident: पर्वरीत भरधाव दुचाकीची पादचाऱ्याला धडक; उपचारादरम्यान मृत्यू

Boeing 737 MAX विमानांना सॉफ्टवेअरचा 'धोका'; लँडिंगवेळी मार्गदर्शन प्रणाली बंद होण्याची शक्यता

El Nino Rabi Crops: 'एल निनो'चा रब्बीला मोठा फटका? केंद्रीय कृषी सचिवांचा इशारा; कोरडवाहू भागांसमोर संकट

ODI World Cup 2027 Schedule: क्रिकेट चाहत्यांसाठी मोठी बातमी! 2027 वनडे वर्ल्ड कपचं शेड्यूल 1 ऑक्टोबरला होणार जाहीर

Goa SIR: 'अल्पसंख्याकांना लक्ष्य केलेले नाही'; SIR वादावर मुख्यमंत्री सावंतांचा दावा, विरोधकांचे आरोप तथ्यहीन

SCROLL FOR NEXT