Gauri Achari Case: गौरी खूनप्रकरणी आज न्यायालयात सुनावणी!

Gauri Achari Case: बिद्रेविरोधात पोलिसांनी खून व पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवला आहे.
Dr. Gauri Achari Murder Case
Dr. Gauri Achari Murder CaseDainik Gomantak
Published on
Updated on

Gauri Achari Case: जुने गोवे येथील प्राध्यापक गौरी आचारी हिच्या खूनप्रकरणी संशयित गौरव बिद्रे याच्याविरोधात जुने गोवे पोलिसांनी सादर केलेल्या आरोपपत्रावरील सुनावणीला सुरूवात झाली आहे. ही सुनावणी आरोप निश्‍चितीसाठी आजपासून सुरू होणार आहे.

बिद्रेविरोधात पोलिसांनी खून व पुरावे नष्ट केल्याचा आरोप ठेवला आहे. या 303 पानी आरोपपत्रात पोलिसांनी 49 जणांच्या साक्षी नोंदवल्या आहेत. अजूनही तपास सुरू असून लवकरच पुरवणी आऱोपपत्र दाखल करण्यासाठी जुने गोवे पोलिसांचे प्रयत्न सुरू आहेत.

Dr. Gauri Achari Murder Case
Goa Weather: आता तापमानाची मिळेल योग्य अन्‌ वेळेत माहिती!

दरम्यान, गुन्हेगारीची पार्श्‍वभूमी असलेला संशयित गौरव बिद्रे याने गोव्यातील वास्‍तव्यावेळी मुंबईत (Mumbai) त्याच्याविरुद्ध सुरू असलेल्या खटल्यांची माहिती उघड केली नव्हती. जिम ट्रेनर असलेल्या गौरवची पार्श्‍वभूमी तपासून पाहण्यापूर्वीच गोवा पोलिसांनी दहशतवादविरोधी कक्षाच्या कमांडोजना प्रशिक्षण देण्यासाठी त्याची मदत घेतली होती.

तसेच, त्याने पोलिसांशी जवळीक करून व सेलिब्रिटींना प्रशिक्षण देत असल्याचे वरिष्ठ पोलिस अधिकाऱ्यांना सांगून त्यांच्यावर छाप पाडली होती. गुन्हेगारी विचारसरणी असलेल्या संशयित गौरव ब्रिदे याने गौरी हिचा खून करेपर्यंत पोलिसही बेदखल होते. या घटनेनंतरच त्याचा खरा चेहरा समोर आला होता.

Dr. Gauri Achari Murder Case
Goa News: गोव्यात वाहतूक परवाने प्रक्रियेला वेग!

कदंब पठार येथील भाडेपट्टीच्या फ्लॅटमध्ये गौरव बिद्रे हा कुटुंबासह राहत होता. मात्र फ्लॅटमालकाने त्याचा सी फॉर्म जवळच्या जुने गोवे (Old Goa) पोलिस स्थानकात सादर केला नव्हता. त्यामुळे या प्रकरणामध्ये फ्लॅटचा मालकही जबाबदार आहे. त्याने वेळीच ही माहिती सादर केली असती तर ही घटना टळलीही असती. पोलिसांनी फ्लॅटमालकाविरुद्ध कोणतीच कारवाई केलेली नाही. पोलिसांनीही मात्र त्याला मोकाट सोडले आहे. त्‍यामुळेच गौरीचा जीव गेला होता.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
var bottom_sticky_ad = googletag .sizeMapping() .addSize([1000, 0], [[728, 90]]) .addSize( [0, 0], [ [320, 50], [300, 50], [320, 100] ] )         .build()
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com