Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

पिळगावात तीन माजी सरपंचांची हुकली संधी; आरक्षणाचा फटका

Goa Panchayat Election : 19 उमेदवार निवडणूक रिंगणात

दैनिक गोमन्तक

डिचोली : मये मतदारसंघातील पिळगाव पंचायतीतून एकूण 19 उमेदवार निवडणूक रिंगणात असून, बहूतेक सर्व प्रभागात चुरस आहे. एका उमेदवाराची बिनविरोध निवड झाल्याने या पंचायतीच्या सातपैकी सहा प्रभागांतून निवडणूक होणार आहे. 'एसटी'साठी राखीव प्रभाग-३ मधून चेतन विष्णू खोडगिणकर हे बिनविरोध निवडून आले आहेत.

मावळत्या पंचायत मंडळातील प्रदीप नाईक, निलेश जल्मी व संदीप सालेलकर या तीन सरपंचांना प्रभाग आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यामुळे त्यांची निवडणूक लढण्याची संधी हुकली आहे. मावळत्या उपसरपंच उर्मिला परब गावकर याही रिंगणात नाहीत. मावळते पंच ललना गिमोणकर, अनिल नाईक आणि स्वप्नील फडते हे पुन्हा आपले भवितव्य अजमावत आहेत.

प्रभाग-1 मधून मावळते पंच अनिल नाईक यांच्यासमोर ज्ञानेश्वर जल्मी आणि सुनील वायंगणकर यांचे आव्हान आहे.

प्रभाग-2 मधून मावळते पंच स्वप्नील फडते यांच्यासमोर महेश शिरोडकर यांचे आव्हान आहे. प्रभाग-4 मधून मावळत्या पंच ललना गिमोणकर आपले भवितव्य अजमावत आहेत. या प्रभागातून मावळत्या उपसरपंच उर्मिला परब गावकर यांचे पती उमाकांत परब गावकर यांच्यासह रामा फडते निवडणूक लढवीत आहेत.

प्रभाग पाचमधून सर्वाधिक 7 जण रिंगणात !

'महिलांसाठी राखीव प्रभाग-5 मधून सगळ्यात जास्त सात उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात आहेत. माजी सरपंच प्रदीप नाईक यांच्या पत्नी सुचिता नाईक यांच्यासह अमृता नाईक, भावना साळगावकर, राधिका सावंत, सलोनी लिंगुडकर आणि शनया वळवईकर या निवडणूक लढवीत आहेत.

'एसटी'साठी राखीव प्रभाग-6 मधून अनिता सालेलकर आणि मोहिनी जल्मी आमनेसामने आहेत. 'महिलां''साठी राखीव असलेल्या प्रभाग- 7 मधून गौतमी गावस आणि उज्वला बेतकेकर आमनेसामने आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Fatima Sana Shaikh In Goa: 20 मिनिटांचा संघर्ष अन् 'ती' धाडसी उडी! 'दंगल' गर्लचा गोव्यात थरार, फातिमा सना शेखचा Video Viral

Virat Kohli Viral Post: विराट कोहलीचा दोन वर्षांनंतर मोठा निर्णय; सोशल मीडियावरील 'त्या' पोस्टनं खळबळ!

Mandovi Bridge: मांडवी पुलावर 'नो एन्ट्री'! 11 जानेवारीला 'या' वेळेत नव्या आणि जुन्या पुलावरून वाहतूक पूर्णपणे बंद

Raia Fire News: ..आणि बघता बघता डोंगरच पेटला! राय येथील घटना; अग्निशामक दलाचे शर्थीचे प्रयत्न

Tara Sutaria Breakup: तारा सुतारिया आणि वीर पहाडियाचे ब्रेकअप? 'त्या' व्हायरल व्हिडिओनंतर नात्यात दुरावा Watch Video

SCROLL FOR NEXT