धमकीप्रकरणी फोंडा पोलिसांत तक्रार दाखल

गावकरवाडा - उसगाव येथील गोसेवक राजीव झा यांना गेल्या मंगळवारी 26 रोजी सलीम शेख नामक व्यक्तीने फेसबूकवरून धमकी देण्याबरोबरच आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल फोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

फोंडा : गावकरवाडा - उसगाव येथील गोसेवक राजीव झा यांना गेल्या मंगळवारी 26 रोजी सलीम शेख नामक व्यक्तीने फेसबूकवरून धमकी देण्याबरोबरच आक्षेपार्ह मजकूर पोस्ट केल्याबद्दल फोंडा पोलिसांत तक्रार दाखल करण्यात आली आहे.

Goa Crime News
Goa Zuari Bridge Accident : अमित पालेकरांची गोवा सरकारवर जोरदार टीका, म्हणाले...

राजीव झा यांनी ही तक्रार आज (गुरुवारी) फोंडा पोलिस स्थानकाचे निरीक्षक विजयकुमार चोडणकर यांना दिली असून संशयिताचा पत्ता समजू शकला नसल्याने पोलिसांनी याप्रकरणी त्वरित कारवाई करण्याची मागणी करण्यात आली आहे.

दरम्यान, देशभरात अराजकता माजवण्यासाठी कारणीभूत ठरत असलेल्या पॉप्युलर फ्रंट ऑफ इंडिया या संघटनेवर सरकारने त्वरित बंदी आणावी अशीही मागणी काही हिंदू संघटनांनी आज क्रांती मैदानावर येऊन केली. यासंबंधीचे एक निवेदनही पोलिसांना देण्यात आले आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Goa State Pollution Control Board report
Narendra Sawaikar Post Controversy
Salman Khan Goa project news
bombay high court goa bench
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com