Goa Bench Of Bombay High Court | Goa Panchayat Election Dainik Gomantak
गोवा

ओबीसी आरक्षणावरची सुनावणी पूर्ण; निवाडा राखीव

एससी, एसटी आणि महिला आरक्षणाबाबत बदल करण्याची याचिका गोवा खंडपीठाने फेटाळून लावली

दैनिक गोमन्तक

पणजी : प्रभाग फेररचना व ओबीसी आरक्षणावरून सुरवातीपासूनच पंचायत निवडणुका वादग्रस्त ठरत आहेत. त्यातच राज्य निवडणूक आयोगाने जाहीर केलेल्या एससी, एसटी व महिला आरक्षणाबाबत बदल करण्याची याचिका गोवा खंडपीठाने आज फेटाळून लावली. तर ओबीसी आरक्षणाशिवाय निवडणुका घेऊ नयेत यासंदर्भातील याचिकेवरची सुनावणी आज पूर्ण झाली. याबाबतचा निकाल न्यायालयाने राखीव ठेवला आहे.

सर्वोच्च न्यायालयाने स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये ओबीसींना आरक्षण द्यावयाचे झाल्यास ते त्रिसूत्री पद्धतीने द्यावे असे आदेश दिले होते. पुलाखालून बरेच पाणी वाहून गेल्यानंतर राज्य सरकारच्या पंचायत संचालनालयाच्या वतीने 10 ऑगस्ट रोजी या निवडणुका जाहीर केल्या. तसेच राज्य निवडणूक आयोगाने ओबीसींना वगळून एसटी, एससी आणि महिलांच्या प्रभाग आरक्षणाची घोषणा केली. याविरोधात असलेल्या दोन याचिकांवर मंगळवारी खंडपीठात सुनावणी झाली.

राज्य सरकारकडे माहितीच नाही!

पंचायत निवडणुका ओबीसी आरक्षणाशिवाय घेऊ नयेत व ओबीसीला आरक्षण मिळावे याकरिता खंडपीठात याचिका दाखल झाली होती. त्याचा निवाडा न्यायालयाने राखून ठेवला आहे. राज्य निवडणूक आयोगाच्या वतीने वकील एस.एन.जोशी म्हणाले, ओबीसींना आरक्षण देण्याकरता सर्वोच्च न्यायालयाने त्रिसूत्री पद्धतीचे निकष दिले आहेत. तशी माहिती सध्या राज्य सरकारकडे नाही. इतर माहिती सरकारनेही आयोगाला सादर केलेली नाही, असे सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Android युजर्ससाठी खूशखबर! WhatsApp चा लूक पूर्णपणे बदलणार; आता तुमच्या फोनमध्येही दिसणार iPhone सारखा स्टायलिश 'फ्लोटिंग बार'!

Goa Postmen: गोव्यातील पोस्टमन 'आऊटसाईडर', 15 वर्षांपासून रोजंदारीवर; कायमस्वरूपी नोकरीसाठी आमदार आमोणकरांना साकडे

Pakistan Minister Video: ''अशी परत जाऊ नकोस''! पाकिस्तानी मंत्र्याचा महिला पत्रकाराची खिल्ली उडवणारा व्हिडिओ व्हायरल; यूजर्सनी घेतलं फैलावर

VIDEO: 'मुंबईचा राजा रोहित शर्मा...' मैदानात चाहत्यांची जोरदार घोषणाबाजी; हिटमॅनची 'ती' खास रिअ‍ॅक्शन कॅमेऱ्यात कैद, व्हिडिओ व्हायरल!

आखाड्यात अनियमित पाणीपुरवठ्याने नागरिक त्रस्त, महिलांची पाण्यासाठी धावपळ; विहिरींचे पाणीही पिण्यायोग्य नसल्यानं नाराजी

SCROLL FOR NEXT