Viresh Borkar |Goa News Dainik Gomantak
गोवा

MLA Viresh Borkar: 'सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास उपोषण करु'- वीरेश बोरकर

Viresh Borkar : सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर अन्याय होत आहे

दैनिक गोमन्तक

Goa Latest News: गेल्‍या 60 वर्षांपासून स्‍वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर अन्‍याय सुरू आहे. अनेक सरकारे आली आणि गेली. तरीसुद्धा त्यांना सरकारी नोकरी देण्याचे आश्‍वासन अजूनही पूर्ण झालेले नाही. सरकारने हे आश्‍वासन 19 डिसेंबरपर्यंत पूर्ण न केल्यास उपोषण करण्याचा इशारा स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांनी दिला असल्‍याचे रिव्होल्‍युशनरी गोवन्‍सचे आमदार वीरेश बोरकर यांनी सांगितले. पणजी येथे घेतलेल्या पत्रकार परिषदेत ते बोलत होते.

55 वर्षे पूर्ण होऊन सरकारी नोकरीसाठी पात्र नसलेल्या स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांना सरकारने एकवेळ भरपाई देण्याची मागणी त्यांच्याकडून केली जात आहे. सरकारकडून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर अन्याय होत आहे. गोवा मुक्तीसाठी स्वातंत्र्यसैनिकांनी बलिदान दिल्याचे जनतेने पाहिले आहे.

परंतु स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे उलटूनही त्यांना त्यांचे हक्क मिळालेले नाहीत. प्रत्येक सरकारने त्यांना फक्त खोटी आश्वासने दिली. म्‍हणून न्यायासाठी त्यांचा लढा आजही सुरूच आहे, असे बोरकर म्‍हणाले.

मुख्‍यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी स्‍वातंत्र्यसैनिकांच्या कुटुंबातील किमान एका व्यक्तीला सरकारी नोकरी देण्याचे आश्वासन दिले होते. मात्र ते अद्याप पूर्ण झालेले नाही. मुख्यमंत्र्यांनी दिलेले आश्‍वासन त्वरित पूर्ण करावे, अशी मागणी बोरकर यांनी केली. अन्‍यथा आंदोलनाशिवाय पर्याय नसल्‍याचा इशारा बोरकर यांनी दिला.

...म्‍हणूनच न्‍यायासाठी उतरावे लागतेय रस्‍त्‍यावर

गोव्‍याला स्‍वातंत्र्य मिळाल्‍यापासून स्वातंत्र्यसैनिकांच्या मुलांवर सरकारकडून अन्‍याय सुरू आहे. या काळात अनेक सरकारे आली आणि गेली, पण स्‍वातंत्र्यसैनिकांच्‍या समस्‍यांकडे, त्‍यांच्‍या मुलांना नोकरी देण्‍याकडे कुणीच लक्ष दिलेले नाही.

त्‍यामुळे आज त्‍यांना न्‍यायासाठी रस्‍त्‍यावर उतरावे लागत आहे. त्‍यांच्‍या आंदोलनाला ‘आरजी’ पक्षाचा पूर्ण पाठिंबा असेल, अशी ग्‍वाही आमदार वीरेश बोरकर यांनी दिली. स्वातंत्र्यानंतर 60 वर्षे उलटूनही स्‍वातंत्र्यसैनिकांना त्यांचे हक्क मिळत नाहीत, ही दुर्दैवी गोष्‍ट असल्‍याचेही ते म्‍हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

IND vs WI 3rd T20I: दुसऱ्या सामन्यातील पराभवानंतर टीम इंडियात मोठा बदल? नमन धीरऐवजी 'या' खेळाडूला मिळू शकते संधी

कामात दिरंगाई केल्यास थेट बडतर्फी! CM सावंत यांचा सरकारी अधिकाऱ्यांना इशारा

Viral Video: सामसूम रस्ता, किर्र अंधार अन् सायकलवरून बाप-लेकीचा प्रवास; अचानक मागून कारची एन्ट्री झाली अन् चालकाने... पाहा व्हिडिओ

Money Laundering Case: 3 कोटींच्या मनी लाँडरिंग प्रकरणात पाच आरोपींवर आरोप निश्चित; 'ईडी'ची कारवाई

Under 19 Cricket: आफ्रिद राजाक्कनावरची नाबाद 82 धावांची खेळी व्यर्थ; गोव्याचा सलग दुसरा पराभव, जम्मू-काश्मीरने 69 धावांनी नमविले

SCROLL FOR NEXT