Goa Government | CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: मनोहर पर्रीकर संशोधनाभिमुख कक्ष सुरू करा

Pramod Sawant: मुख्यमंत्र्यांचे आवाहन : विविध स्पर्धांतील विजेत्यांना बक्षिसांचे वितरण

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: भारतीय जनता पक्ष हा राजकीय कामाबरोबरच सामाजिक, सहकारी व सांस्कृतिक क्षेत्रातही विविध क्षेत्रातील घटकांना संघटित तसेच सहभागी करून काम करत आहे. या पक्षाने आतापर्यंत विविध सोळा कक्ष स्थापन केले आहेत. व्यावसायिक व कला क्षेत्राचा समावेश असलेला मनोहर पर्रीकर संशोधनाभिमुख कक्ष सुरू करण्याचे आवाहन मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केले.

इन्स्टिट्यूट मिनेझिस ब्रागांझा सभागृहात भाजपच्या सांस्कृतिक कक्षातर्फे गणेशोत्‍सव काळात घेण्यात आलेल्या विविध स्पर्धांचा बक्षीस वितरण कार्यक्रमात ते बोलत होते. यावेळी सदानंद शेट तानावडे, बाबू कवळेकर उपस्थित होते.

‘भाजपने राखली विविधतेतून एकता’

मुख्यमंत्री सावंत म्हणाले की, भाजपने देशातील संस्कृतीच्या जतनासाठी विविधतेतून एकता व अखंडता राखून ठेवली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ही संस्कृती जपून ठेवण्यासाठी पावले उचलली आहेत. त्यामुळेच भाजपतर्फे राज्यातील व ग्रामीण भागामध्ये लपून असलेली प्रतिभा समोर आणण्यासाठी व युवा पिढीला प्रोत्साहन देण्यासाठी ही स्पर्धा घेण्यात आली.

आरती व्हिडिओ स्पर्धेत उत्कर्ष शिरोडकर प्रथम

यावेळी मुख्यमंत्र्यांच्या हस्ते कुटुंब आरती व्हिडिओ स्पर्धेत प्रथम क्रमाक उत्कर्ष शिरोडकर (शिरोडा), नैवेद्य पान स्पर्धेत प्रथम क्रमांक जान्हवी जयेश बोंद्रे (म्हापसा), सेल्फी विथ लॉर्ड गणेशा स्पर्धेत देवांगणा चोडणकर (हळदोणे) व रांगोळी स्पर्धेत काशिनाथ च्यारी (थिवी) यांना स्मृतिचिन्ह, रोख रक्कम व प्रशस्तीपत्र देण्यात आली. याशिवाय या स्पर्धेत सहभागी झालेल्या सर्व स्पर्धकांनाही प्रशस्तिपत्रे देण्यात आली.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Diwali Bonus for Central Govt Employees: केंद्रीय कर्मचाऱ्यांना दिवाळीची मोठी भेट! मोदी सरकारकडून बोनस जाहीर; खात्यात येणार 'इतके' पैसे

Crime News: आधी प्रेमसंबंध, नंतर हत्येचा कट! पत्नीने पतीच्या मदतीने प्रियकराचा गळा आवळला; मृतदेह गोणीत भरून कालव्यात फेकला

Triple Talaq Case: लग्नानंतर 21 वर्षे संसार, 3 मुलं आणि आता...! बायकोला ट्रिपल तलाक देणाऱ्या नवऱ्याला कोर्टाचा दणका; सुनावली 'इतक्या' वर्षांची शिक्षा अन् दंड

VIDEO: 'सर्वात मोठे ओठ' बनवण्याचा अट्टहास! डॉक्टरांनी नकार दिल्यावर महिलेने घरीच घेतलं इंजेक्शन; पुढे नको तेच झालं, पाहा व्हिडिओ

Bulbul Film Festival: बुलबुल बालचित्रपट महोत्सवाची सांगता; 'द ग्रेट ग्रॅंड सुपर हिरो'चे प्रदर्शन, सर्वोत्तम चित्रपटाची घोषणा

SCROLL FOR NEXT