Goa News | Manjunath Desai Dainik Gomantak
गोवा

Goa News: कार्डियाक युनिटला डॉ. मंजुनाथ देसाईंचे नाव द्या - प्रमोद सावंत

Goa News: मुख्यमंत्री : माहितीपट पाहून आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे यांच्यासह उपस्थितांचे डोळे पाणावले

दैनिक गोमन्तक

Goa News: अखेरच्या श्‍वासापर्यंत रुग्णांसाठी धडपडणाऱ्या डॉ. मंजुनाथ देसाई यांच्यावरील माहितीपट पाहून आज आरोग्यमंत्र्यांसह उपस्थितांचे डोळे पाणावले. १० हजारांहून अधिक हृदय शस्त्रक्रिया करणाऱ्या देसाईं यांचे गोमेकॉच्या कार्डियाक युनिटच्या उभारणीत महत्त्वाचे योगदान आहे.

त्यामुळे नव्याने उभारण्यात येणाऱ्या सुपर स्पेशिलिटी ब्लॉकच्या कार्डियाक विभागाला त्यांचे नाव देणार, अशी घोषणा मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. दरबार हॉलमध्ये दिवंगत डॉ. मंजुनाथ देसाई यांच्या स्मृतीप्रित्यर्थ व्याख्यानाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता.

यावेळी राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई, आरोग्यमंत्री विश्‍वजीत राणे, केंद्रिय मंत्री श्रीपाद नाईक, डॉ. थिओडोर अब्राहम, डॉ. गुरूप्रसाद नाईक आदी उपस्थित होते. कार्यक्रमात देसाई यांच्या आयुष्यपटावरील माहितीपट सादर करण्यात आला.

यावेळी राज्यातील अनेक मंत्र्यांसह आमदार, ॲड. जनरल देविदास पांगम, उद्योगपती श्रीनिवास धेंपो व गोमॅकोच्या विविध विभागाचे प्रमुखांसह मान्यवरांनी हजेरी लावली.

सदैव समाजाचा विचार

मुख्यमंत्री सावंत म्हणाले, डॉ. देसाई यांनी सदोदित इतरांचा विचार केला. कार्डियालॉजी विभागातील कर्मचाऱ्यांचे वेतन वाढावे, अशी त्यांची शेवटची इच्छा होती. यासाठी ते सतत प्रयत्न करीत होते. त्यांनी आपल्यासाठी, आपल्या कुटुंबियांसाठी कधीच काही मागितले नाही. नेहमी समाजाचा विचार करणारे ते डॉक्टर होते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Yemen Saudi Arabia Missile Attack: यमनचा सौदीवर मोठा हल्ला! हवाई अड्डे उद्ध्वस्त, रिफायनरीतून आगीचे लोट; कोट्यवधींचे नुकसान

Talha Saeed Anti India Speech: ''दिल्ली कुणाची होती विसरलात का?" हाफिज सईदच्या लेकानं भारताविरोधात ओकली गरळ; तल्हा सईदच्या रॅलीनं वादंग VIDEO

Goa Ashtami Fair: 'अष्टमी'च्या फेरीने मांडवी किनारा गजबजला! कार्यालये सुटताच गर्दीला उधाण; कपड्यांच्या खरेदीला सर्वाधिक पसंती

India Defence Deal: चीन-पाकिस्तानचा थरकाप उडणार! भारतीय सैन्याची ताकद अनेक पटींनी वाढणार; 1.10 लाख कोटींच्या संरक्षण कराराला मोदी सरकारची मंजुरी

Collared Kingfisher Research: गोव्याच्या किनारी परिसंस्थेसाठी 'कॉलर्ड किंगफिशर'चा अभ्यास! MFG- GBCNचा संयुक्त संशोधन प्रकल्प; पक्ष्याबाबत मिळविणार माहिती

SCROLL FOR NEXT