Margao Dindi Utsav: मडगावच्या दिंडीला पुढील वर्षी राज मान्यता मिळणार; CM प्रमोद सावंत यांची घोषणा

मडगावच्या दिंडीला पुढील वर्षी राज मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना केली.
Goa Government | CM Pramod Sawant
Goa Government | CM Pramod SawantDainik Gomantak
Published on
Updated on

पणजी: मडगावच्या दिंडीला पुढील वर्षी राज मान्यता देणार असल्याची घोषणा मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी यावेळी बोलताना केली. ते पुढे म्हणाले दिंडीला राज्यस्तरीय उत्सवाचा दर्जा मिळणार, गोवा ड्रगचे नाही तर कला व संस्कृतीचे माहेरघर आहे; युवा पिढी कला पुढे नेत आहेत.

(Margao Dindi Utsav CM Pramod sawant)

Goa Government | CM Pramod Sawant
Goa News : गोव्यातील वेश्याव्यवसायात महाराष्ट्राच्या मुली, 36% व्यवसाय ऑनलाईन

मडगावचा प्रसिद्ध दिंडी महोत्सवाला 1 नोव्हेंबरपासून सुरुवात

गेली दोन वर्षे कोविडमुळे प्रातिनिधिक स्वरूपात आयोजिण्यात आलेला मडगावचा प्रसिद्ध दिंडी महोत्सव यंदा उत्साहाने साजरा करण्याचा निर्णय श्री हरिमंदिर देवस्थान विश्र्वस्त मंडळाने घेतला आहे. दिंडी उत्सवाचे हे 113 वे वर्ष असून 1 ते 7 नोव्हेंबर असे सात दिवस हा दिंडी उत्सव विविध धार्मिक व सांस्कृतिक कार्यक्रमांनी साजरा केला जाणार आहे.

दरम्यान, ही माहिती मडगावात घेतलेल्या पत्रकार परिषदेत मंडळाचे अध्यक्ष सुहास कामत यांनी दिली. पत्रकार परिषदेला सचिव मनोहर बोरकर, उपाध्यक्ष नीलेश कांदे, संयुक्त खजिनदार योगेश मुंज, सभासद शरद नाईक हे मान्यवर उपस्थित होते.

Goa Government | CM Pramod Sawant
Goa Petrol Price: आंतरराष्ट्रीय बाजारात कच्च्या तेलाच्या किमतीत वाढ गोव्यातील इंधनाच्या किमतीवर परिणाम?

मुख्य दिवसाचा कार्यक्रम

रविवार, 6 नोव्हेंबर रोजी सायंकाळी श्री माऊलीची धार्मिक ग्रंथासह श्रींच्या रथात स्थापना, हरिमंदिराच्या व्यासपीठावर पहिली गायन बैठक, दुसरी बैठक बॅंक चौकात व तिसरी बैठक नगरपालिका चौकात पार पडली.

रात्री श्री दामोदर बोगदेश्र्वर दिंडी पथक (वास्को) आणि गोव्याबाहेरील निमंत्रित वारकरी भजनी मंडळांसह श्री विठ्ठल रखुमाई रथाचे श्री हरिमंदिर येथूून प्रस्थान होईल. तिसरी बैठक झाल्यावर रथ श्री राम मंदिर, श्री दामोदर साल व श्री विठ्ठल मंदिर येथे प्रस्थान होणार झाले.

शेवटचा दिवस

सोमवार, 7 नोव्हेंबर हा दिंडी उत्सवाचा शेवटचा दिवस असून दुपारी श्रींच्या दिंडी रथाचे श्री हरिमंदिरात आगमन व त्यानंतर गोपाळकाला व महाआरती, सायंकाळी पावणी व रात्री सुप्रसिद्ध गायिका सुजाता गुरव (धारवाड) यांच्या गायनाने दिंडी उत्सवाची समाप्ती होणार आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Goa News on Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com