CM Pramod Sawant Dainik Gomantak
गोवा

Pramod Sawant: सीएसआर प्राधिकरणाकडून कंपन्यांची पडताळणी सुरू

Pramod Sawant: सीएसआर प्राधिकरणाने काटेकोर नियम बनवले आहेत.

दैनिक गोमन्तक

Pramod Sawant: राज्यातील उद्योगांनी व्यावसायिक, सामाजिक जबाबदारी (सीएसआर) पाळावी, जेणेकरून त्याचा फायदा सामाजिक उपक्रमासाठी होईल. याबाबत सीएसआर प्राधिकरण पडताळणी करत असून प्राधिकरणाने दखल घेण्यापूर्वी दोन टक्के नफा समाजासाठी खर्च करा, अशी सूचना मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केली. यासाठी हिरो मोटोकॉर्प कंपनीचा आदर्श घ्यावा, असेही ते म्हणाले.

आल्तिनो येथील कार्यक्रमात दुचाकी प्रदान करण्यात आल्या. यावेळी मुख्यमंत्री बोलत होते. या कार्यक्रमास पोलिस महासंचालक जसपाल सिंग, पोलिस महानिरीक्षक ओमवीर बिष्नोई आणि कंपनीचे अधिकारी उपस्थित होते.

मुख्यमंत्री म्हणाले की, राज्यातील उद्योजकांनी आपला दोन टक्के नफा सामाजिक जबाबदारी म्हणून खर्च करावा, ज्यातून विकासकामे करता येतील. सीएसआर प्राधिकरणाने काटेकोर नियम बनवले आहेत.

भाडेकरूंची ओळख महत्त्वाची

राज्यातील गुन्हेगारीच्या आकडेवारीवरून काही गोष्टी समोर आल्या आहेत. या गुन्ह्यांमध्ये परराज्यांमधील गुन्हेगारांचा समावेश आहे. त्यामुळे अनोळखी व्यक्तींना भाडेकरू म्हणून ठेवू नका किंवा त्यांची सविस्तर माहिती पोलिसांना सादर करा. बलात्कार व अन्य गुन्ह्यांमध्येही परप्रांतीय गुन्हेगार सापडत आहेत हे गंभीर आहे, अशी खंत मुख्यमंत्री सावंत यांनी व्यक्त केली.

"जलद कमाई आणि झटपट श्रीमंत होण्यासाठी गोव्यातली तरुणाई अमली पदार्थांची तस्करी आणि व्यापाराकडे वळत आहे, ही चिंतेची बाब आहे. कोणत्याही परिस्थितीत राज्यातून अमली पदार्थ व्यवहार हद्दपार केले जातील."

- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Pitbull Dog Attack: चिंबल येथे पिटबूल कुत्र्याचा हल्ला; 10 वर्षांची लहानगी गंभीर जखमी

Viral: मास्तर बनला प्रभु देवा...मुकाबला गाण्यावर केला जबरदस्त डान्स; पोरं झाली थक्क, WATCH VIDEO

Shravan Somvar 2025: मन:शांती आणि समस्यामुक्तीसाठी श्रावण सोमवार; जाणून घ्या रुद्राभिषेकाचे महत्त्व आणि सोपी पद्धत

Goa Village Tourism: "आम्हाला प्रकल्प हवाच!" सुर्ला ग्रामस्थांकडून इको-टुरिझमचे स्वागत; शासनाच्या प्रकल्पाला ग्रामसभेचा पाठिंबा

PM Narendra Modi: 'पंतप्रधान नरेंद्र मोदी भगवान विष्णूंचे 11वे अवतार!' भाजप नेत्याच्या वक्तव्याने खळबळ; सांगितले 'हे' कारण

SCROLL FOR NEXT