Mopa Airport: पेडणे तालुक्यातील मोपा विमानतळाचे काम अंतिम टप्प्यात येत असताना विमानतळाला नाव कोणाचे द्यायचे? याबाबत रस्सीखेच सुरू असताना जीएमआर कंपनीने या आंतरराष्ट्रीय विमानतळाचे ‘न्यू गोवा विमानतळ’ आंतरराष्ट्रीय एअरपोर्ट, मोपा असा ब्रँड आयडेंटिटी लोगो लॉंच केला आहे.
या नियोजित आंतरराष्ट्रीय विमानतळाला पहिले मुख्यमंत्री स्व. भाऊसाहेब बांदोडकर, माजी मुख्यमंत्री आणि केंद्रीय संरक्षणमंत्री मनोहर पर्रीकर, पहिले विरोधी पक्षनेते जॅक सिक्वेरा यांच्यापैकी एकाचे नाव द्यावे, यासाठी त्यांच्या समर्थक गट पुढे येत आहेत.
याशिवाय आणखी काही नावे पुढे येत आहेत. ही नामांतराच्या रस्सीखेच सुरू असतानाच ज्या कंपनीकडून हे विमानतळ उभारण्यात येत आहे. त्या जीएमआर कंपनीने आपल्या ब्रँड लोगोचे अनावरण केले आहे. याबाबतचा अंतिम निर्णय केंद्र सरकार आणि नागरी विमान वाहतूक मंत्रालय घेईल, असे मुख्यमंत्र्यांनी यापूर्वीच सांगितले आहे .
असा आहे ‘नवा लोगो’
कंपनीने जाहीर केलेले नवा लोगो सकारात्मक, आशावादी आणि स्मार्ट आहे. सन सॅन्ड आणि पाम ट्री यासह समुद्र, आकाश, पृथ्वी आणि गोवा यापासून प्रेरणा घेऊन तयार करण्यात आलेला आहे.
न्यू गोवा विमानतळ हे आरामदायी आणि प्रेरक असे असल्याने असून भारताच्या नैऋत्य किनाऱ्यावर राज्याच्या भौगोलिक स्थानाचा ठामपणा अधोरेखित करते. नव्या लोगोतील रंगसंगती ही इथल्या वातावरणाशी साधर्म्य दाखवणारी आहे.
आमच्या मौल्यवान ग्राहकांना प्रेरित करण्यासाठी आम्ही हा लोगो लाँच केला आहे. यात गोव्याच्या अस्तित्वाचा अंश असून ग्राहकांना आंतरराष्ट्रीय दर्जाची सेवा देण्यासाठी आम्ही बांधील आहोत. याची ग्वाही स्पष्ट करतो. दरवर्षी ४४ लाख प्रवाशांना सेवा देण्यासाठी नवीन गोवा विमानतळ टप्प्याटप्प्याने विकसित केला जाईल आणि प्रवासी वाढीनुसार आणि मागणीनुसार वाढवले जाईल.
- आर व्ही शेषन, सीएओ, जीजीआयएएल
जीएमआर कंपनीने मोपा विमानतळाचा ‘न्यू गोवा विमानतळ’ अशा लाँच केलेला लोगोला आमच्या सरकारच्या नागरी विमान वाहतूक मंत्रालयाने परवानगी दिली आहे. तो कराराचाच एक भाग आहे. नावाचा विषय माझ्या अखत्यारीत नाही.
- डॉ. प्रमोद सावंत, मुख्यमंत्री.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.