CM Pramod Sawant Watches Kantara Movie in Goa
CM Pramod Sawant Watches Kantara Movie in GoaDainik Gomantak

Kantara Movie : CM प्रमोद सावंतांनी पाहिला चित्रपट; म्हणाले, दोन गोष्टी लक्षात...

कांताराचं कथानक हे गोव्यातील वीरभद्र या लोककलेशी मिळतंजुळतं असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी म्हटलं आहे.
Published on

Kantara Movie : कांतारा आणि गोव्यातील वीरभद्र या दोन्ही एकाच धाटणीच्या भूमिका आहेत. अशा ऐतिहासिक संदर्भ असलेल्या गोष्टी या सिनेमारुपाने जतन होणं, त्यांचं संवर्धन होणं गरजेचं असल्याचं मत गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी केलं आहे. बहुचर्चित कांतारा चित्रपटाचा आस्वाद गोव्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी घेतला. यावेळी त्यांच्यासोबत गोवा भाजप प्रदेशाध्यक्ष सदानंद शेट तानावडे आणि भाजप नेते दामू नाईक, नरेंद्र सावईकर आदी नेते उपस्थित होते.

कांतारा चित्रपट पाहून आल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी आपली पहिली प्रतिक्रिया दिली आहे. कांतारा पाहिल्यानंतर दोन गोष्टी लक्षात आल्या आहेत. कांताराचं कथानक हे गोव्यातील वीरभद्र या लोककलेशी मिळतंजुळतं असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंतांनी म्हटलं आहे. अशा प्रकारच्या लोककथा सिनेमासारख्या माध्यमांच्या रुपात जतन करुन ठेवणं आवश्यक आहे, अन्यथा ते लोप पावण्याची भीती मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली आहे.

CM Pramod Sawant Watches Kantara Movie in Goa
kantara Movie पाहून CM सावंतांना आठवले गोव्यातला 'दैव'! वाचा 'वीरभद्र'विषयी

दुसरीकडे गोव्यात आतापर्यंत तब्बल 10 हजार वनहक्क दावे सरकारला प्राप्त झाले आहेत. यापैकी जवळपास 2500 दावे निकाली काढण्यात आले आहेत. तसंच उरलेले दावेही लवकरात लवकर काढण्यासाठी सरकार प्रयत्नशील असल्याचं मुख्यमंत्री प्रमोद सावंत यांनी म्हटलं आहे. कांतारा चित्रपट पाहिल्यानंतर मुख्यमंत्र्यांनी या दोन गोष्टी सांगितल्या आहेत.

साखळीजवळील श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात वीरभद्र नृत्याची परंपरा

कारापूरच्या श्री विठ्ठल मंदिराची स्थापना विठ्ठलापूर येथे 1392 मध्ये झाल्याचे मानले जाते. श्री विठ्ठल हे भगवान विष्णूचे लोकप्रिय रूप आहे, जे गोवा, महाराष्ट्र, कर्नाटक आणि दक्षिण भारतातील इतर भागांमध्ये भक्ती पंथाचा प्रचार करतात. श्री विठ्ठलाने प्रामुख्याने शैव आणि वैष्णव या दोन पंथांमधील दरी कमी करण्यात मदत केली आणि म्हणूनच साखळीजवळील श्री विठ्ठल मंदिराच्या परिसरात वीरभद्र नृत्य केले जाते.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com