Amit Patkar | Goa News  Dainik Gomantak
गोवा

Amit Patkar: मोपावरील नोकऱ्यांवरून लक्ष हटविण्यासाठीच नावाचा वाद

Amit Patkar: रोजगारात स्‍थानिकांना प्राधान्‍य हवे; काँग्रेसला राजकारण करायचे नाही

दैनिक गोमन्तक

Amit Patkar: मोपा विमानतळावर राज्यातील युवकांना नोकऱ्या देण्याच्या विषयावरून लक्ष हटविण्यासाठी या विमानतळाच्या नावाचा वाद भाजपने सुरू केला असल्याचा आरोप काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष अमित पाटकर यांनी केला.

काँग्रेस भवनात पं. नेहरू यांच्‍या जयंतीनंतर मोपा विमानतळावरून सुरू झालेल्या वादावर काँग्रेसचे मत विचारण्यात आले. त्यावर पाटकर स्वतःची भूमिका मांडली. ते म्हणाले, मोपा विमानतळावर स्थानिकांना किती नोकऱ्या दिल्या जाणार आहेत, कोणत्या क्षेत्रात या नोकऱ्या असणार आहेत हे पाहणे आवश्‍यक आहे.

स्थानिकांच्या नोकऱ्यांचा प्रश्‍न सोडविण्याकडे लक्ष देण्याऐवजी हा नावाचा वाद निर्माण केला आहे. सध्या पोटापाण्याचा प्रश्‍न कसा सोडवायचा हा युवकांपुढे प्रश्‍न आहे. तो प्रश्‍न सोडवण्यावर भर देणे आवश्‍यक आहे.

फ्रान्सिस सार्दिन यांनी काँग्रेसच्या काळात मोपा विमानतळ निर्माण करण्याचा विचार पुढे आणला होता. आम्हाला नावावर राजकारण करायचे नाही, येथील युवकांच्या नोकऱ्यांचा प्रश्‍न सरकारने सोडवायला हवा, असे पाटकर म्‍हणाले.

विरोधी पक्षनेते युरी आलेमाव म्हणाले की, दाबोळी विमानतळावर विमाने उतरवण्यासाठी वेळेचे बंधन आहे. त्यामुळे आंतरराष्ट्रीय विमानफेऱ्या या मोपावर जातील. हळूहळू दाबोळीवरील सर्व फेऱ्या मोपाकडे वळविल्या जातील.

दाबोळी हा संरक्षण दलाचा विमानतळ असल्याने त्यावर मर्यादा आहेत. मी यापूर्वीच दाबोळी विमानतळाविषयीची शक्यता वर्तविली आहे आणि त्यावर ठाम आहे, असेही ते म्‍हणाले.

..तर गप्‍प बसणार नाही

मोपा विमानतळासाठी स्‍थानिकांच्‍या जमिनी गेल्‍या आहेत. काहींना अजून मोबदलाही मिळालेला नाही. त्‍यातच आता अशा कुटुंबातील सदस्‍याला या प्रकल्‍पाच्‍या ठिकाणी नोकरीतून कमी करण्‍यात येत आहे. हा प्रकार सहन करणार नाही व गप्‍पही बसणार नाही, असा इशारा पाटकर यांनी दिला.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Water Taxi: गोव्यात लवकरच धावणार पाण्यावरची टॅक्सी! कोचीचे पथक करणार पाहणी; प्रवाशांना मिळणार नवा पर्याय

Goa News Live: ओपा पाणी प्रक्रिया प्लांटमध्ये विद्युत बिघाड, तिसवाडी, फोंड्यात मर्यादीत पाणी पुरवठा

Goa Politics: खरी कुजबुज; पैशांसाठी भारतीय स्त्रिया बनल्या विधवा?

Goa Rain: गोव्यात अतिवृष्टीने दाणादाण! शाळांना सुट्टी, अनेक ठिकाणी पडझड; पुन्हा ऑरेंज अलर्ट जारी

Women Workers Goa: महिला कामगारांबाबत महत्वाचा निर्णय! वेळ निश्चिती, सुरक्षितेबाबत अधिसूचना जारी

SCROLL FOR NEXT