Maya Heble IFFI 2022 |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Maya Heble IFFI 2022: ‘फिक्सेशन’मुळे गोव्यात येण्याची मिळाली संधी

Maya Heble IFFI 2022: मूळ भारतीय वंशाची कॅनडास्थित अभिनेत्री ‘जीवाचा करणार गोवा’

यशवंत पाटील

53rd IFFI 2022: मूळ भारतीय वंशाची कॅनडास्थित माया हेबळे आणि मॅक्स टॉपलिन यांची निर्मिती असलेला ‘फिक्सेशन’ हा इंग्रजी चित्रपट काल आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवात दाखविण्यात आला. या चित्रपटातील कलाकारांसह माया हेबळे व मॅक्स टॉपलिन यांनी आज पत्रकारांशी संवाद साधला आणि आपल्या चित्रपटाविषयीची माहिती दिली. केवळ चार महिन्यांत या चित्रपटाचे चित्रीकरण झाल्याचे टॉपलिन यांनी सांगितले.

माया हेबळे ही मूळ भारतीय वंशाची असून तिचे आजी आणि आजोबा मुंबईचे. यावेळी ती आपल्या भारत आणि मुंबईविषयीच्या प्रेमाबद्दल भरभरून बोलली. ‘फिक्सेशन’ या चित्रपटामुळे आपल्याला गोव्यात आणि भारतात यायला मिळाले, त्‍याबद्दल आपल्याल खूप आनंद होत असल्याचे तिने सांगितले.

‘फिक्सेशन’ हा चित्रपट एक मनोवैज्ञानिक थ्रिलर आणि हत्येचे रहस्य उलगडणारा आहे. मानसिक आजार, स्मरणशक्ती आणि मानसोपचार यांचा एक विचित्र प्रकार या सिनेमात चित्रित करण्यात आला आहे.

एका तरुण महिलेला एका खुनाच्या खटल्यात शिक्षा सुनावण्यापूर्वी तिचे मानसिक परीक्षण केले जाते. पण चाचण्या अधिकच वैयक्तिक आणि भयावह झाल्यामुळे ती तिच्या डॉक्टरांच्या खऱ्या हेतूवर प्रश्नचिन्ह निर्माण करते अशा आशयाची या चित्रपटाची कथा असल्याचे माया हेबळे आणि मॅक्स टॉपलिन यांनी सांगितले.

माया भेटणार नातेवाईकांना :

इफ्फीनिमित्त गोव्यात आणि भारतात यायला मिळाल्यामुळे अतिशय उत्साहित झालेली मूळ भारतीय वंशाची, पण सध्या कॅनडास्थित माया हेबळे हिने गोवा तर आपण पाहणारच आहे, शिवाय मुंबईतील नातेवाईकांनाही भेटणार असल्‍याचे सांगितले.

हेबळे हे आडनाव गोव्याला मिळतेजुळते असल्याने तुम्ही मूळ गोंयकार आहात का, असा प्रश्न विचारला असता, याबाबत आपल्‍याला निश्‍चित काही माहीत नाही. पण आपल्या आजी-आजोबांना माहिती असेल, असे तिने सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Electricity: गोव्यातील वीज ग्राहकांसाठी गूड न्यूज! वीज बिलाचा शॉक टळला; 137 कोटींची तूट सावंत सरकार भरुन काढणार

Goa Air Pollution: वास्को आणि डिचोलीत वाढला प्रदूषणाचा धोका! हवेची गुणवत्ता चिंताजनक पातळीवर; राज्य प्रदूषण नियंत्रण मंडळाचा धडकी भरवणारा रिपोर्ट

Narendra Sawaikar Post Controversy: 'झुरळांसह वाळवी, देशाला वाचवा'... भाजप नेत्याच्या पोस्टने गोव्यात खळबळ; नरेंद्र सावईकर यांच्या विधानावर विरोधकांचा हल्लाबोल!

Candolim Illegal Road Widening: सलमान खानच्या प्रकल्पासाठी बेकायदेशीर रुंदीकरण? आमदार मायकल लोबो अडचणीत; कांदोळीतील नागरिकांचा खळबळजनक आरोप

Advocate Ankur Kumar Attack: पोलिसांना निष्काळजीपणा भोवणार! वकील अंकुर कुमार हल्ल्याप्रकरणी हायकोर्ट संतापले; दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 24 तासात चौकशी सुरु करा

SCROLL FOR NEXT