Prasad Oak |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Prasad Oak IFFI 2022: ‘आनंद दिघे’ साकारणे होते खूपच अवघड!

Prasad Oak In IFFI 2022: फोटो, व्हिडिओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेल्‍या माहितीद्वारे भूमिका साकारली

अनिल पाटील

Prasad Oak In IFFI 2022: धर्मवीर आनंद दिघे पडद्यावर साकारणे खूप अवघड टास्क होता. शिवाय ते नैतिक जिम्मेदारीचे काम होते. मात्र दिग्दर्शकांनी उपलब्ध केलेले फोटो, व्हिडिओ आणि त्यांच्या सहकाऱ्यांनी दिलेली माहिती यांच्या आधारे अनेक दिवसांच्या अभ्यासानंतर ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ साकारला आणि त्याने इतिहास घडवला अशी माहिती प्रसिद्ध अभिनेते प्रसाद ओक यांनी पत्रकार परिषदेत दिली.

इफफीच्या इंडियन पॅनोरमा विभागात या चित्रपटाचे प्रदर्शन झाले. त्याला रसिकांकडूनही मोठा प्रतिसाद लाभला. ओक म्हणाले, ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील अनंत दिघे साकारणे खूप अवघड काम होते. कारण त्यांना मी कधीही पाहिले नव्हते.

मी पुण्याहून मुंबईला आलो तेव्हा दिघे आपल्यात नव्हते. त्यामुळे दिग्दर्शकांनी उपलब्ध केलेले फोटो, व्हिडिओ आणि त्या काळातील दिघे साहेबांच्या सहकऱ्यांनी दिलेली माहितीच्या आधारावर त्यांची व्यक्तिरेखा साकारली.

त्यांचे हावभाव, चाल, देहबोली मी पडद्यावर साकार करू शकलो. या चित्रपटाचे शूटिंग सुरू असताना हजारो लोक आम्हाला सेटवर भेटत आणि वेगवेगळी माहिती देत हे चित्रपट साकारताना उपयोगी पडले.

स्‍वप्‍न साक्षात उतरले : मंगेश देसाई

चित्रपटाचे निर्माते मंगेश देसाई म्हणाले, दिघे साहेबांवर चित्रपट बनवण्याचे माझे 2013चे स्वप्न होते. प्रत्यक्षात ते 2022 ला साकार झाले. दिघे साहेबांना ठाण्यात ‘देव’ म्हणणारे हजारो, लाखो लोक आहेत. आयुष्यभर वेगवेगळ्या लोकांना मदत करणारे दिघे साहेब गरिबांचे देवच होते.

अनेकांना मदत करण्यासाठी ते नेहमी तत्पर असत. मात्र, त्यांच्याबद्दल खरी माहिती लोकांसमोर जाण्याऐवजी चुकीची माहिती जगापुढे येत होती. म्हणूनच हा चित्रपट बनवण्याचे आपण ठरवले. त्यास दिग्दर्शक प्रवीण तरडे यांनी साथ दिली आणि या चित्रपटाने महाराष्ट्रात आणि महाराष्ट्राबाहेरही इतिहास घडविला.

" ‘धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे’ चित्रपटातील अनंत दिघे साकारणे खूप अवघड काम होते. कारण त्यांना मी कधीही पाहिले नव्हते. मी पुण्याहून मुंबईला आलो तेव्हा दिघे आपल्यात नव्हते. त्यामुळे दिग्दर्शकांनी उपलब्ध केलेले फोटो, व्हिडिओ आणि त्या काळातील दिघे साहेबांच्या सहकाऱ्यांनी दिलेली माहितीच्या आधारावर त्यांची व्यक्तिरेखा साकारली."

- प्रसाद ओक, अभिनेता

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

सीटवरुन झाला वाद, भावांनी ट्रेनमध्ये बॉम्बची अफवा पसरवली; अम्रपाली एक्सप्रेसमध्ये धावपळ, पोलिसांची उडाली तारांबळ

60 कोटींची टांगती तलवार, शिल्पा शेट्टीचं गोव्यात 'होम-हवन'! बास्टियनची पारंपरिक सुरुवात

डिसेंबर 1986, राजभाषा आंदोलनाने उग्र स्वरूप धारण केले, सासष्टीत जिलेटिन स्‍फोट होत होते, स्‍फोटक वातावरणात 'रवीं'नी मडगाव गाठले

Coconut Tree: पोर्तुगीज येण्याआधीपासून गोव्यात असलेला, 80 देशांत लागवड होणारा कल्पवृक्ष 'नारळ'

Diwali 2025: पणजीत कारीट खातेय भाव! दिवाळी खरेदीसाठी गर्दी वाढली; आकाशकंदील, पणत्यांना मागणी

SCROLL FOR NEXT