IFFI New Movie Premiere: रणदीप-इलियानाच्या 'या' चित्रपटाचा 'इफ्फी'मध्ये होणार ग्रँड प्रीमियर

गोऱ्या त्वचेच्या हव्यासावर असलेल्या या सोशल कॉमेडी चित्रपटाची गेल्या काही काळापासून चर्चा
IFFI New Movie Premiere
IFFI New Movie PremiereDainik Gomantak

IFFI New Movie Premiere: बॉलीवूड अभिनेता रणदीप हुड्डा आणि अभिनेत्री इलियाना डिक्रुज यांच्या आगामी 'तेरा क्या होगा लवली' हा चित्रपट गेल्या काही दिवसांपासून चर्चेत होता. या चित्रपटाती या दोन्ही कलाकारांचा फर्स्ट लूक आता समोर आला आहे. या चित्रपटाचा ग्रँड प्रीमियर गोव्यात सुरू असलेल्या 53 व्या इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलमध्ये होणार आहे. (Randeep Hooda Ileana D'Cruz Upcoming Movie)

IFFI New Movie Premiere
Ranbir Kapoor-Alia Bhatt Daughter Name: रणबीर-आलियाच्या कन्येच्या नावाचे आहेत अनेक अर्थ, तुम्हाला माहिती आहेत का?

53 व्या इंडियन इंटरनॅशनल फिल्म फेस्टिव्हलला पणजीत 20 नोव्हेंबरपासून सुरुवात झाली आहे. या फेस्टिव्हलमध्ये 25 नोव्हेंबर रोजी या चित्रपटाचा प्रीमियर होणार आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन बलविंदर सिंह जंजुआ यांनी केले आहे. त्यांनी रणदीपसोबत नेटफ्लिक्सची सीरीज 'कॅट'मध्येही काम केले आहे.

हरियाणाच्या पार्श्वभुमीवर घडणारी ही कथा आहे. रूपिंदर चहल, अनिल रोधन आणि कुणाल मांडेकर यांच्या सहकार्याने बलविंदर यांनी ही कहाणी लिहिली आहे. हा एक सामाजिक कॉमेडी चित्रपट असणार आहे. भारतातील गोऱ्या त्वचेचा हव्यास असलेल्या लोकांच्या मानसिकतेवर यातून भाष्य करण्यात आले आहे. या चित्रपटाचे नाव पुर्वी अनफेयर अँड लव्हली असे ठेवण्यात आले होते, नंतर ते बदलले गेले.

IFFI New Movie Premiere
Goa IFFI 2022: गुंतवणूकदारांच्या अपेक्षांचा सिनेमांवर परिणाम होतो- अभिनेत्री लासिया नागराज

रणदीपने इन्स्टाग्रामवरून ही माहिती दिली आहे. दरम्यान, या महोत्सवातील आपल्या चित्रपटाच्या गाला प्रीमियरबाबत म्हणाला की, इफ्फीत प्रीमियरचा खूप आनंद आहे. पहिल्यांदाच या चित्रपटाचा दर्शकांना अनुभव घेता येईल.

दरम्यान, रणदीप आगामी काळात स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या बायोपिकमध्येही मुख्य भूमिका साकारत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन महेश मांजरेकर करणार आहेत. या चित्रपटातील रणदीपचा लूकदेखील प्रसिद्ध झाला आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

दैनिक गोमन्तक आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी फेसबुक, इन्स्टाग्राम, ट्विटर, शेअर चॅट आणि टेलिग्राम आम्हाला फॉलो करा. तसेच, दैनिक गोमन्तकच्या यूट्यूब चॅनेलला आजच सबस्क्राइब करा.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com