Priyanandan IFFI 2022 |Goa News  Dainik Gomantak
गोवा

Priyanandan IFFI 2022: आदिवासी कलाकारांनीच साकारला ‘धाबरी कुरुवी’

Priyanandan IFFI 2022: ‘इरुला’ भाषेतील पहिला चित्रपट

दैनिक गोमन्तक

53rd IFFI 2022: या वर्षीच्या इफ्फीमध्ये विविध विषयावर लक्ष वेधणारे सिनेमा इंडियन पॅनोरमा विभागात निवडले गेले होते. त्यातही केरळमधील ''इरुला'' या स्थानिक आदिवासी भाषेतील पहिल्या ‘धाबरी कुरुवी’ या सिनेमाने जाणकारांचे विशेष लक्ष वेधले.

कारण एकतर हा सिनेमा ‘इरुला’ भाषेतील आणि फक्त आणि फक्त आदिवासी कलाकारांनीच अभिनय केलेला हा भारतीय सिनेमाच्या इतिहासातील आजवरचा एकूणच पहिला सिनेमा होता. आणि त्याचवेळी तो या आदिवासी समाजातील एका अत्यंत महत्त्वाच्या म्हणजेच, अविवाहित महिलांच्या प्रश्नांचा ऊहापोह, या सिनेमात केला आहे.

पत्रकार परिषदेत या चित्रपटाबद्दल दिग्दर्शक, प्रियनंदन म्हणाले, अनेक आदिवासी मुली, ज्या स्वतःसाठी उभे राहायला विसरून गेल्या आहेत. त्यांच्या आयुष्यात त्यांच्या समुदायायाकडून जे जे काही लादलं जातं, ते ‘आपलं नशीब’ म्हणून मुकाट्याने सहन करत असतात, अशा आदिवासी मुलींच्या आयुष्यात काही चांगला बदल घडवण्याची आपली प्रामाणिक इच्छा होती.

चित्रपट हे माध्यम वापरून, एका उद्दिष्टासाठी काम करण्याचा हा माझा प्रयत्न आहे, ही व्यवस्था आपले नशीब आहे, अशाच मनोवृत्तीने हे लोक राहत आहेत, त्यामुळे ते अशा व्यवस्थेतून बाहेर येण्याचा काहीही प्रयत्न करत नाहीत, असेही त्यांनी सांगितले.

मीनाक्षी आणि श्यामिनी, या दोघी या चित्रपटातील प्रमुख व्यक्तिरेखा साकारणाऱ्या अभिनेत्री आणि चित्रपटाचे छायाचित्रकार, अश्वघोषण हे ही यावेळी उपस्थित होते.

ही कथा, एका साध्या भोळ्या आदिवासी मुलीची कथा आहे, जी स्वतःच्या मानवी हक्कांसाठी, स्वतःच्या शरीरावर, स्वतःच्या आयुष्यातील निर्णयाबाबतच्या अधिकारांसाठी राखेतून पुन्हा एकदा जन्म घेते. एका दंतकथेनुसार, ‘धाबारी कुरुवी’ ही लोककथेतील एक चिमणी असते, जिचे वडील अज्ञात असतात.

एखादे ठिकाण, एखादा समुदाय, तिथेले लोक यांना समाजाच्या मुख्य प्रवाहाच्या बाहेर ठेवणे, त्यांची टिंगल करणे, अशा मानसिकतेवर बोट ठेवत, ही मानसिकता बदलण्याचा आपला प्रयत्न असल्याचे प्रियनंदन यांनी सांगितले.

भाषेचा अडथळा कुठेच नाही!

हा चित्रपट तयार करताना भाषेमुळे काही आव्हाने आलीत का? याविषयी सांगतांना प्रियानंदन म्हणाले, ही सगळी प्रक्रिया अगदी सहज झाली. ‘आमच्या भावना सारख्या होत्या, त्या एकमेकांपर्यंत पोहोचत होत्या, त्यामुळे भाषेचा अडथळा कुठेच आला नाही.

या चित्रपटाची संहिता पहिल्यांदा मल्याळममध्ये लिहिली गेली आणि नंतर तिचे इरूला भाषेत भाषांतर करण्यात आले. नाट्य अकादमीमध्ये प्रशिक्षण घेतलेल्या काही आदिवासी लोकांनी मला ही संहिता लिहिण्यात मदत केली, असे त्यांनी सांगितले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Death Penalty News: लाखो निष्पापांच्या रक्ताने माखलेले हात, 24 वर्षांच्या जुलमी राजवटीचा भयानक अंत; 'या' देशाच्या माजी राष्ट्राध्याक्षासह भावाला फाशीची शिक्षा

Abhishek Porel Arrested: लव्ह, सेक्स अन् ब्लॅकमेलिंग! 23 वर्षीय स्टार आयपीएल खेळाडूला बलात्कार प्रकरणात अटक; उच्च न्यायालयाच्या आदेशानंतर मोठी कारवाई

Benjamin Netanyahu: "मी पंतप्रधान असेपर्यंत पॅलेस्टिनी राष्ट्र होणार नाही!", नेतन्याहूंचा डोनाल्ड ट्रम्पला मोठा झटका; धुडकावली 15 कलमी योजना

Chaturgrahi Yog 2026: नोकरीत प्रमोशन अन् नव्या जबाबदाऱ्या! चतुर्ग्रही योग 'या' 4 राशींसाठी ठरणार वरदान; व्यवसायात होणार कोट्यवधींचा नफा

Sarfaraz Khan: 17 किलो वजन घटवलं, काश्मीरमध्ये कसून सराव; कसाेटी संघात पुनरागमन झालेल्या सर्फराझ खानची कठोर मेहनत

SCROLL FOR NEXT