पणजी: राज्यात सध्या मुसळधार पावसाचा जोर सुरु आहे. राजधानी पणजीसह या पावसाने अनेक ठिकाणं बुडवून टाकली आहेत. कालपासून सुरु असलेल्या या पावसाने जोरदार हजेरी लावत राजधानी पणजीसह डिचोली, साखळी आणि वाळपईला पावसाने झोडपलं असताना "पाऊस कितीही मोठा असला तरीही पणजीमध्ये कुठलीही काळजी करण्यासारखं कारण नाही" असं पणजीचे महापौर रोहित मोन्सेरात म्हणाले आहेत.
गोव्यात सुरु असलेल्या अतिवृष्टीमुळे राज्यात २० आणि २१ अशा दोन दिवसांसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला नागरिकांना सतर्कतेचा इशारा देण्यात आलाय.
मंगळवार (दि. २०) रोजी पडलेल्या मोठ्या पावसामुळे खोर्ली-जुने गोवे, फोंडा राज्य सहकारी बँकेजवळ, भाईडवाडा-कोरगाव, कुडचडे, पिळर्ण येथील पार्क रेजिना हॉटेजवळ, पर्वरीतील सुकूर चर्चजवळ, डिचोली आणि परिसर, काणकोण, जुने गोवे येथील आडोशी मैदानाजवळ, अंजुणे धरणाजवळ, वाळपई, थिवी, चोर्ला घाट या भागांमध्ये अनेक झाडांची पडझड केली.
मात्र पणजी शहराच्या बाबतीत काहीच काळजी करण्याची गरज नसल्याचं महापौरांचं म्हणणं आहे. रोहित मोन्सेरात यांच्या मतानुसार पणजी शहरात धोकादायक झाडांबद्दल बोलायचं झालं तर ३५० धोकादायक झाडांपैकी फक्त १५० झाडं तोडायची आहेत, ज्याबद्दल जीईसीशी बोलणं झालं असून त्यांनी सुमारे २० धोकादायक इमारतींची यादी पाठवली आहे, त्यामुळे शहरातील लोकांना घाबरण्याची मुळीच गरज नाही.
नेवगीनगर येथील पणजी-सांताक्रूझ रस्त्याची अवस्था अगोदरच बिकट झाली होती, अनेक ठिकाणी भूमिगत मलनिस्सारण वाहिनीसाठी केलेले चेंबरच्या जागेवरील खड्डे व्यवस्थित भरले गेले नसल्याने रस्ता ओबडधोबड बनला होता. त्या रस्त्याचे डांबरीकरण होणं आवश्यक होतं आणि काल दिवसभर पाऊस सुरु असताना देखील या रस्त्याचे डांबरीकरण सुरु होतं.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.