Goa Exam  Dainik Gomantak
गोवा

Goa Government Job : सरकारी नोकरीची संधी; गोव्यात यूपीएससीच्या धर्तीवर जीपीएससीची परीक्षा

सरकारला प्रस्ताव : ज्युनियर श्रेणीची 24 पदे; 3 हजारांपैकी केवळ 141 जण पात्र

दैनिक गोमन्तक

Goa Education: राज्यातील राजपत्रित अधिकाऱ्यांच्या पदासाठी गोवा लोकसेवा आयोगामार्फत (जीपीएससी) प्रवेश परीक्षा घेण्यात येतात. सरकारी खात्यांमधील रिक्त पदांसाठीची परीक्षा एकाचवेळी घ्याव्यात, यासंदर्भातचा प्रस्ताव जीपीएससीने राज्य सरकारला सहा महिन्यांपूर्वी सादर केलेला आहे.

केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या (यूपीएससी) धर्तीवर जीपीएससी परीक्षा झाल्यास उमेदवारांच्या गुणवत्तेनुसार इच्छुक खात्यात वर्णी लावणे शक्य होईल.

नुकतीच जीपीएससीमार्फत गोव्यातील ज्युनियर श्रेणी अधिकाऱ्यांच्या 24 पदांसाठी प्रवेश परीक्षा घेण्यात आली. यासाठी तीन हजार उमेदवारांनी अर्ज केले होते. पूर्व स्क्रिनिंग परीक्षेत 141 जण पात्र ठरले असून त्यांना पुढील चाचणीला सामोरे जावे लागणार असल्याचे आयोगाचे अध्यक्ष जुझे मान्युएल डिसोझा यांनी सांगितले.

आयोगाची परीक्षेसाठी पूर्वतयारी करण्याची गरज आहे. त्यासाठी अनेकदा तीन वर्षांपासून त्याची तयारी करावी लागते. त्यामुळे ज्यांना या परीक्षेला सामोरे जायचे आहे, त्यांनी आयोगाच्या संकेतस्थळावर विविध प्रश्‍नपत्रिका व त्याचे उत्तरे तसेच या परीक्षेसाठीचा अभ्यासक्रम याची माहिती देण्यात आलेली आहे.

या घेण्यात आलेल्या पूर्व स्क्रिनिंग परीक्षेत अनेकांना वेळेत प्रश्‍नपत्रिका सोडवता आली नाही. या परीक्षेसाठी एका प्रश्‍नाची बहुउत्तरे असतात व ही उत्तरे सगळीच बरोबर असल्याची भासतात. त्यामुळे निर्णय घेण्यास उमेदवारांना वेळ होतो.

या परीक्षेत वेळेचे बंधन व त्वरित निर्णय घेण्याची क्षमता याला अधिक प्राधान्य असते. त्यामुळे त्यासाठी चांगली तयारी करावी लागते, असे डिसोझा म्हणाले.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Rishabh Pant Record: गिलख्रिस्टचा वर्ल्ड रेकॉर्ड उद्ध्वस्त! ऋषभ पंत बनला 'सिक्सर किंग', परदेशात 'अशी' कामगिरी करणारा ठरला पहिलाच खेळाडू

Investment Fraud: भरघोस परताव्याचं स्वप्न दाखवलं अन् 85.5 लाखांवर डल्ला! शिवोलीतील महिलेची फसवणूक, मुंबईतील दाम्पत्याविरोधात गुन्हा दाखल

AUS vs BAN: क्रिकेटविश्वात मोठा उलटफेर! बांगलादेशनं बलाढ्य ऑस्ट्रेलियाला 9 विकेट्सनं लोळवलं, 30 मिनिटांत कांगारूंचा खेळ खल्लास Watch Video

Viral Video: मंदिरात दर्शन घेऊन बाहेर आला अन् गर्दीत चप्पल गायब! गोव्याच्या पठ्ठ्यानं थेट 'ChatGPT'ची घेतली मदत; काही क्षणांत... पाहा व्हायरल व्हिडिओ

राजकारणात खळबळ! पक्षाच्या कार्यालयात लटकलेल्या अवस्थेत आढळला नेत्याचा मृतदेह; सुसाइड नोटमध्ये लिहिलं, 'राजकारणात आलो, हीच मोठी चूक'

SCROLL FOR NEXT