Goa Crime: शंभर रुपयांसाठी तरुणाचा खून

Goa Crime: संशयित अटकेत : करंझाळे समुद्रकिनाऱ्यावरील घटना
 Crime News | Goa News
Crime News | Goa News Dainik Gomantak
Published on
Updated on

Goa Crime: करंझाळे-मिरामार येथे समुद्रकिनारी शनिवारी मध्यरात्री दारूच्या नशेत उसने दिलेल्या 100 रुपयांवरून एकाचा खून केल्याची घटना घडली. संशयित मोहनराव केसरकर (29) याने समीर ऊर्फ छोटू (26) याच्या डोक्यावर लाकडी ओंडक्याने प्रहार करून खून केला.

समीर ऊर्फ छोटू व मोहनराव केसरकर हे करंझाळे येथे राहतात. समीरने मोहनराव याच्याकडून 100 रुपये उसणे घेतले होते. शनिवारी रात्री दोघेही दारू पिऊन करंझाळे समुद्रकिनाऱ्यावर आले.

त्यांच्यामध्ये पैशांच्या व्यवहारावरून वाद सुरू झाला व त्याचे पर्यावसान मारहाणीत झाले. यावेळी मोहनरावने समीरला लाथाबुक्क्यांनी मारहाण केली. पैसे देत नाही, असे समीरने सांगितल्याने चिडलेल्या मोहनरावने समुद्रकिनाऱ्यावरील लाकडामधील एक दंडुका आणून त्याच्या डोक्यावर व चेहऱ्यावर प्रहार केला.

 Crime News | Goa News
Goa Crime: दारुच्या नशेत कंरजाळे किनाऱ्यावर एकाचा खून; पैशांच्या व्यवहाराचा होता वाद

यात समीर जागीच ठार झाला. सकाळी काही जणांनी त्याचा मृतदेह पाहिल्यावर पोलिसांना कळविले. याप्रकरणी मोहनरावला अटक करण्यात आली आहे.

यापूर्वीही हत्येचा आरोप

संशयित मोहनराव याचा 2010 साली जुने गोवे येथील पती-पत्नी व दोन मुले मिळून चौघांच्या खुनाच्या प्रकरणात त्याचा समावेश होता. खुनाच्या खटल्यातून तो दोन वर्षापूर्वी निर्दोष सुटला होता.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

UP Ballia School Teacher Suspended
Pradeep Yadav Bail Rejected
POCSO Case Goa
Goa Uncle Murder Case
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com