Damodar Kochkar | Goa News Dainik Gomantak
गोवा

Damodar Kochkar: उद्योजकांसह कामगारांनाही किमान वेतनवाढ अमान्‍य

Damodar Kochkar: अधिसूचनेवर नाखूश : उद्योग इतर राज्यांत जाण्याची भीती

दैनिक गोमन्तक

Damodar Kochkar: सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरता वेतनवाढ मसुदा अधिसूचनेवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत. कोरोनामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे.

आता वेतनवाढ मंजूर केली तर परिणामी व्यवसाय बंद पडतील किंवा इतर राज्यात जातील, अशी भीती औद्योगिक असोसिएशनने व्यक्त केली. तर महागाईचा विचार केल्यास हे दर अकुशलसाठी 900 तर कुशल कामगारांसाठी 1200 रुपये असावे, असे मत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केले आहे.

सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वतीने विविध क्षेत्रात कार्यरत असलेल्या कर्मचाऱ्यांकरता वेतनवाढ मसुदा अधिसूचनेवर उलटसुलट प्रतिक्रिया येत आहेत.

कोरोनामुळे व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. आता वेतनवाढ मंजूर केली तर परिणामी व्यवसाय बंद पडतील किंवा इतर राज्यात जातील, अशी भीती औद्योगिक असोसिएशनने व्यक्त केली.

तर महागाईचा विचार केल्यास हे दर अकुशलसाठी 900 तर कुशल कामगारांसाठी 1200 रुपये असावे, असे मत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केले आहे. राज्य सरकारच्या कामगार आणि रोजगार मंत्रालयाच्या वेतनवाढीवर उद्योग क्षेत्राकडून तीव्र प्रतिसाद उमटत असून या अधिसूचनेने उद्योग क्षेत्रावर विपरीत परिणाम होऊन उद्योग व्यवसाय संपेल असे म्हटले आहे, तर या वेतनवाढीवर कामगार संघटनाही खूष नसून प्रस्तावित वेतनवाढ कमी असून ती वाढवली पाहिजे, असा त्यांनी आग्रह धरला आहे.

सरकारने वेतनवाढीची मसुदा अधिसूचना जारी केली आहे. मार्च 2016 ला सध्याची वेतनवाढ जाहीर करण्यात आली होती. सहा वर्षांपूर्वी जाहीर केलेल्या वेतनवाढीनुसार अकुशल कामगारांसाठी 360 रुपये, तर कुशल कामगारांसाठी 423 रुपये वेतन दर आहे,

तर आता अकुशल कामगारांसाठी 425 आणि कुशल कामगारांसाठी 806 रुपये वेतन दर सुचवण्यात आले आहेत. यावर हरकती आणि सूचना मागवल्या आहेत. याही आता मोठ्या प्रमाणात येत आहेत.

यावर उद्योग जगताकडून तीव्र प्रतिक्रिया उमटत आहे. कोरोनामुळे लघु आणि मध्यम उद्योगांचा उत्पादन व व्यवसायावर विपरीत परिणाम झाला आहे. किमान वेतन दर हे पहिल्यांदाच काम करणाऱ्या कामगारांना देण्यात येते.

त्यामुळे ही वेतनवाढ वाढवू नये, असे मत गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर यांनी व्यक्त केली आहे.

दुसरीकडे, ‘उद्योजक कोरोनाचे कारण देऊन प्रस्तावित दरवाढीला विरोध करत आहेत ही शुद्ध पिळवणूक आहे. सध्याच्या सरकारने सुचवलेली दरवाढी ही 6 वर्षानंतरची आहे. याला आमचा विरोध आहे.

कारण वाढलेल्या जीवनावश्यक वस्तूंचे दर, पेट्रोल, डिझेल, गॅस सिलेंडरसारख्या वस्तूंचे गगनाला भिडलेले दर पाहता कामगारांचे जीवन अधिक त्रासाचे बनत आहे. त्यामुळे अकुशल कामगारांसाठी 900 रुपये, तर कुशल कामगारांसाठी 1200 रुपये दर असावा, असे मत कामगार नेते ख्रिस्तोफर फोन्सेका यांनी व्यक्त केले आहे.

देशातील सर्वाधिक वाढ : कोचकर

  • गोवा राज्य औद्योगिक असोसिएशनचे अध्यक्ष दामोदर कोचकर म्हणाले, की बहुतांश उद्योग अडचणीत आहेत. व्यवसाय बंद करायची इच्छा नसल्याने तशाही स्थितीत व्यावसायिक उद्योग सुरू ठेवतात.

  • सध्या सुचवलेली सुधारित वेतनवाढ ही देशात सर्वाधिक आहे. त्यामुळे असे झाल्यास व्यवसाय बंद होतील किंवा दुसऱ्या राज्याकडे जातील, अशी भीती कोचकर यांनी व्यक्त केली आहे.

"कामगारांची वेतनवाढ दर 2 वर्षांनी शास्त्रशुद्ध पद्धतीने सर्वेक्षणाअंती झाली पाहिजे. कारण अलीकडच्या काळात दर दोन वर्षांनी बहुतांश वस्तूंचे दर वाढलेले असतात. त्यामुळे जुन्या दराने वेतन देवून कामगारांकडून काम करून घेणे हे अनैतिक आहे. ही कामगारांची पिळवणूक आहे आणि ती थांबलीच पाहिजे."

- ख्रिस्तोफर फोन्सेका, कामगार नेते

"कामगारांच्या वेतनवाढीबाबत सरकार जो निर्णय घेईल तो सर्वसमावेशक (रॅशनल) असावा. गोव्यात बहुतांश उद्योगांसाठीचा कच्चामाल मिळत नसल्याने कच्चामालाच्या आयात आणि पक्क्यामालाची निर्यात यामुळे उद्योगांसाठीची लॉजिस्टिक कॉस्ट खूप आहे. त्यामुळे सरकारने जो निर्णय घ्यायचा आहे तो सर्वसमावेशक असावा."

- मांगिरीश पै रायकर, उद्योजक

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Bison In Sawantwadi: एक, दोन नव्हे… थेट 15 गवारेड्यांचा धुमाकूळ! लोकांना फुटला घाम, पाहा थरकाप उडवणारा VIDEO

तुम्हालाही विनाकारण राग येतोय? सावधान! असू शकते रक्तातील साखरेच्या बदलांचे लक्षण, 'या' गोष्टी ठेवा लक्षात

Shravan Recipes in Goa: कणगाची खीर, नागपंचमीला पातोळ्या; श्रावणातील गोव्याची समृद्धता

Shubman Gill Record: शुभमन गिल बनणार नवा 'लिजेंड', डॉन ब्रॅडमनचा 88 वर्ष जुना विक्रम मोडणार; फक्त 'इतक्या' धावांची गरज

Goa Fishing: खरा गोंयकार ‘बाप्पा मोरया’ केल्याबरोबर मासळीच्या स्वादाचा आनंद तेवढ्याच खुषीने घेतो..

SCROLL FOR NEXT