Goa Beaches Full with Tourist
Goa Beaches Full with Tourist Sandip Desai
गोवा

Goa Beach: किनारे गजबजले; गोव्यात कोरोनानंतर पर्यटकांमध्ये मोठी वाढ

दैनिक गोमन्तक

Goa Beach: कोविड महामारीनंतर आता गोव्याचे पर्यटन पूर्णपणे खुले झाले आहे. कोविडनंतरच्या या पहिल्या हंगामात गोव्याला यावर्षी अभूतपूर्व पर्यटक संख्येची अपेक्षा आहे. महामारीपूर्वी राज्यात सुमारे 90 लाख पर्यटक होते, ज्यात सुमारे 9 लाख विदेशी पर्यटकांचा समावेश होता. आता यावर्षी यात मोठी वाढ होईल, असे पर्यटन व्यावसायिकांचे म्हणणे आहे.

राज्यात पर्यटन हाच मुख्य व्यवसाय असल्याने खात्याकडून काही नियमावली जारी करण्यात आली आहे. गर्दी नियंत्रित राहण्यासाठी आणि पर्यटकांच्या सुरक्षेसाठी तसेच संख्या वाढविण्यासाठी खात्याने विविध उपक्रम सुरू केले आहेत. राज्यात युके, रशिया, कझाकिस्तान येथील चार्टर विमाने दाखल झाली आहेत. विदेशी पर्यटकांची संख्या वाढल्यास पर्यटनाला आणखी गती मिळेल.

एका वृत्तसंस्थेला दिलेल्या मुलाखतीत पर्यटनमंत्री रोहन खंवटे म्हणाले की, आम्ही कडक नियमावली जारी केली आहे. काही पर्यटक बेशिस्तपणे वागतात, किनाऱ्यावर अस्वच्छता निर्माण करतात. त्यांना काहीतरी समज मिळावी यासाठी हे नियम आहेत. पर्यटकांसाठी सर्व जागा खुल्या आहेत. मात्र, त्यांनीसुद्धा स्वच्छतेबाबत काळजी घ्यायला हवी. याबाबत खासकरून पणजी येथील नागरिकांनी तक्रारी केल्या होत्या, असेही खंवटे यांनी सांगितले.

व्यावसायिक समाधानी

राज्यात पर्यटकांच्या झालेल्या वाढीवर पर्यटन व्यावसायिकांनी समाधान व्यक्त केले आहे. गेल्या दोन वर्षांत पर्यटन व्यावसायिक अडचणीत आले होते. विदेशी पर्यटक नसल्याने स्थानिक पर्यटकांवर अवलंबून राहावे लागले होते, असे टीटीएजीचे अध्यक्ष नीलेश शाह यांनी सांगितले.

जीडीपीत 16.43 टक्के वाटा :

अधिकृत नोंदीनुसार, गोवा पर्यटन क्षेत्राचे ‘जीडीपी’तील योगदान हे 16.43 टक्के इतके आहे. राज्याच्या एकूण लोकसंख्येपैकी 35 टक्के जनता ही या व्यवसायावर अवलंबून आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

गोवा निवडणूक काळात केजरीवालांचा सेव्हन स्टार हॉटेलमध्ये मुक्काम, कोणी दिले बिल? ED ची कोर्टात माहिती

Goa Loksabha: दाबोळीत लोकशाहीचा खून, पोलिस संरक्षणात पैसे वाटल्याचा काँग्रेस उमेदवार विरियातोंचा आरोप

Goa Election 2024 Voting: गोव्यातील अनेक चर्चमधून भाजपला मतदान न करण्याचे आवाहन; माजी मंत्र्याचा गंभीर आरोप

Pastor Dominique Dsouza: उत्तर गोव्यातून तडीपार करण्याच्या कलेक्टरच्या आदेशाविरोधात डॉमनिकची कोर्टात धाव

Goa News: कामुर्लीत घराला आग लागल्याने लाखोंचे नुकसान; मोठी दुर्घटना टळली

SCROLL FOR NEXT