Goa Governor | Sreedharan Pillai
Goa Governor | Sreedharan Pillai Dainik Gomantak
गोवा

P S Sreedharan Pillai: राजकीय पक्षांना देश एकसंघ न ठेवता फोडायचा आहे

दैनिक गोमन्तक

P S Sreedharan Pillai: देशभरात पहिल्यांदाच आदर्श निर्माण करत राज्यपाल पी. एस. श्रीधरन पिल्लई यांनी गोवा ग्राम संपूर्ण यात्रा काढली. आज या यात्रेचा समारोप राजभवनच्या दरबार हॉलमध्ये झाला. मात्र, हा समारंभ प्रमुख पाहुणे तथा केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान आणि केरळ सरकारच्या विवादावर रंगला. काही राजकीय पक्षांना देश एकसंध न ठेवता फोडायचा होता, असे विधान राज्यपाल पिल्लई यांनी यावेळी केले.

राज्यपाल पिल्लई यांनी पहिल्यांदाच गोवा ग्राम संपूर्ण यात्रा करत राज्यातील जनतेशी थेट संवाद साधला होता. त्या यात्रेत प्रामुख्याने नागरिकांकडून पाणी, वीज आणि इंटरनेट कनेक्टिव्हिटीच्या तक्रारी आल्या. जनतेकडून आलेले प्रश्न, समस्या संबंधित खात्यापर्यंत पोचवल्या असून या यात्रेचा आज औपचारिक समारोप झाला.

या समारंभाला प्रमुख पाहुणे म्हणून केरळचे राज्यपाल आरिफ मोहम्मद खान उपस्थित होते. केंद्रीय पर्यटन राज्यमंत्री श्रीपाद नाईक, सभापती रमेश तवडकर, विरोधी पक्षनेते युरी आलेमाव, पर्यटनमंत्री रोहन खंवटे, समाज कल्याण मंत्री सुभाष फळदेसाई, कला व संस्कृती मंत्री गोविंद गावडे आणि आमदार दिगंबर कामत यांच्यासह मान्यवर उपस्थित होते.

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी या समारंभात व्हर्च्युअल सहभाग नोंदवला. सुमारे 15 महिने चाललेल्या या यात्रेच्या निमित्ताने राज्यपालांनी हजारो किलोमीटरचा प्रवास करून राज्यातील 421 गावे आणि 191 ग्रामपंचायत क्षेत्रांतील जनतेशी संवाद साधला. याशिवाय 91 बिगर सरकारी संस्थांना आर्थिक मदत दिली. डायलेसिस, कॅन्सर आणि इतर रोगांनी ग्रस्त असलेल्या 1002 नागरिकांना सुमारे 2.75 कोटी रुपयांची आर्थिक मदत केली.

काही लोक वाद उपस्थित करतात

आजचा समारंभ गाजला तो केरळचे राज्यपाल खान आणि केरळ सरकार यांच्यातील वादाच्या चर्चेने. पिल्लई म्हणाले, काही लोक केवळ वाद उपस्थित करतात. 1947 ते 1951 पर्यंत देशातल्या दोन राजकीय पक्षांना देश एकसंध राहण्याऐवजी देशाचे अनेक तुकडे झालेले हवे होते, असा आरोप करत या वादाला तोंड फोडले.

युरी आलेमाव यांनी साधली संधी

युरी आलेमाव यांना विरोधी पक्षनेते झाल्यानंतर पहिल्यांदाच अशा शासकीय समारंभात बोलण्याची संधी मिळाली. मग सरकारकडून आयआयटी प्रकल्प कशाप्रकारे जनतेवर लादला जात आहे, कर्नाटक सरकार मांडवीचे पाणी पळवत आहे, रस्ते अपघातात रोज अनेकांचा बळी जात आहे आणि अन्न सुरक्षेबाबत सरकार उदासीन आहे, अशा तक्रारींचा पाढाच वाचला.

"देशात समान नागरी कायदा लागू करणारे गोवा राज्य सर्वधर्म समभावाचे उत्तम उदाहरण आहे. ग्राम संपूर्ण यात्रेच्या निमित्ताने गोमंतकीयांच्या चांगुलपणानेही दर्शन झाले. या यात्रेच्या निमित्ताने मला येथील लोकांना मदत करता आली. मानवता हा सर्वश्रेष्ठ धर्म आहे, याचा प्रत्यय आला."

- पी. एस. श्रीधरन पिल्लई, राज्यपाल, गोवा.

"अखंड भारत घडवण्याचे श्रेय सरदार वल्लभभाई पटेल यांनाच दिले पाहिजे. आम्ही अभिमानाने सांगतो की, भारत हा जगातील सर्वांत मोठा लोकशाहीवादी देश आहे. सरदार पटेल यांनी लोकशाहीची वास्तू बांधली असली, तरी त्याचा पाया आणि संरचना केरळमधील आदि शंकराचार्यांनी शेकडो वर्षांपूर्वी घातली होती."

- आरिफ मोहम्मद खान, राज्यपाल, केरळ.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Kanguva: 'कंगुवा'चा टीझर घालतोय धूमाकूळ; गोव्यासह ‘या’ खास ठिकाणी झालं बीग बजेट चित्रपटाचं शूटिंग

Goa Congress: सार्दिन घरात बसून विरियातोंचा प्रचार करतात; पाटकरांनी टोचले MP फ्रान्सिस यांचे कान

Prajwal Revanna: आम्ही व्हिसा दिला नाही… प्रज्वल रेवन्ना जर्मनीला पळून गेल्याच्या प्रश्नावर परराष्ट्र मंत्रालयाची प्रतिक्रिया

Shashi Tharoor In Goa: भाजपला धक्का बसणार, 400 नव्हे 200 पार करने देखील जड जाणार - थरुर

Goa Police : २४ वर्षांपासून अजूनही ‘ते’ न्यायाच्या प्रतिक्षेत; बडतर्फ पोलिसाची व्यथा

SCROLL FOR NEXT