रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त वास्कोत यमदूताच्या अवतारात असलेला कलाकार वाहनचालकांना वाहन नियमांचे धडे देताना (Goa) Dainik Gomantak
गोवा

'वाहने जपून चालवा कारण घरी तुमचे कुटुंबीय वाट पाहतायेत'

गोव्यात 25 ते 31 ऑक्‍टोबर दरम्यान '10व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहा'चे आयोजन

Dainik Gomantak

Goa: वाहतूक नियम (Traffic rules) हे तुमच्या हितासाठी आहेत. ते नियम पाळल्यास अपघात घटतील आणि तुमचे प्राणही वाचतील. तुमची मंडळी तुमची घरी वाट पाहत आहे. वाहने लक्षपूर्वक चालवा जीवन सुरक्षित जगा, हा संदेश देण्यासाठी प्रत्यक्षात यमदूत आज वास्कोत अवतरले व त्याने वाहनचालकांना निर्वाणीचा सल्ला दिला.

वाहतूक खात्याद्वारे '10व्या राज्य रस्ता सुरक्षा सप्ताहा'चे (Road Safety Week) आयोजन 25 ते 31 ऑक्‍टोबर या काळात करण्यात आले असून त्याचाच एक भाग म्हणून वास्कोतील वाहतूक संचालनालयच्या (Directorate of Transportation in Vasco) कार्यालयातर्फे आज वास्को जनजागृती करण्यात आली. यंदापासून ग्रामीण भागात रस्ता सुरक्षेबाबत कळावे यासाठी वाहनांचे उद्घाटन नुकतेच वाहतूक मंत्री माविन गुदिन्हो (Transport Minister Mauvin Godinho) यांच्यातर्फे करण्यात आले. दिवसेंदिवस वाढत्या अपघातांचे प्रमाण वाहतूक व्यवस्थापनाने नियम कडक करूनही नागरिक बेजबाबदारपणे वागताना दिसतात. वारंवार नियमांचे उल्लंघन करताना दिसतात. वाहनचालकांना नियमांची माहिती मिळावी यासाठी वाहनांचे उद्घाटन करण्यात आले आहे. हे वाहन प्रत्येक भागात जाऊन जनजागृती करत आहे.

दरम्यान आज वास्को शहरात सदर वाहन दाखल झाले. त्यांच्याबरोबर वाहतूक खात्याचे यमदेवाच्या वेशातील कलाकार उपलब्ध केला आहे. हा यमदेव रस्ता सुरक्षा सप्ताह निमित्त वाहनचालकात जागृती करत आहे. प्रत्यक्ष आज वास्कोत यमदूत अवतरले व त्यांनी जे नागरिक वाहतूक नियम तोडतात, हेल्मेट न घालता दुचाकी चालवतात त्यांना अडवून त्यांची समजूत काढताना दिसले. नियम न पाळल्यास माझ्याबरोबर चल असा सल्ला त्यांनी नियम न पाळणार्‍या वाहनचालकांना यावेळी दिला. व नियम धाब्यावर बसवणाऱ्या यांचे वास्को चे सहाय्यक वाहतूक संचालक राजेश नाईक यांच्या हस्ते गुलाबपुष्प देऊन त्यांचे स्वागत केले व त्यांची समजूत काढली.

याप्रसंगी वाहतूक सहाय्यक संचालक राजेश नाईक यांच्या बरोबर वाहन निरीक्षक श्रीधर लोटलीकर, सहाय्यक वाहतूक निरीक्षक चतुर पार्सेकर व वाहतूक खात्याचे इतर कर्मचारी उपस्थित होते. यावेळी बोलताना वाहतूक सहाय्यक संचालक राजेश नाईक यांनी वाहनचालकांना संदेश देताना सांगितला की जीवन हे अमूल्य आहे. सगळ्यांनी वाहन चालवताना काळजी घेतली पाहिजे. विचारपूर्वक वाहन चालवा स्वतःला सुरक्षित ठेवणे तुमच्या हातात आहे. तसेच वाहन चालविताना दुसऱ्यांची ही काळजी घेणे तितकीच आवश्यक असे त्यांनी सांगितले.

यमदेवाच्या वेशात असलेल्या कलाकाराने यावेळी बोलताना सांगितले की दुचाकी स्वारांनी हेल्मेट वापरावे. वाहनचालकांनी सीट बेल्टचा वापर करावा व वेगावर नियंत्रण ठेवावे. मद्यपान करून वाहन चालवू नये. वाहतूक नियमांचे उल्लंघन करू नये. वाहने लक्षपूर्वक चालवा जीवन सुरक्षित जगा. असेच पालकांनी लहान वयात मुलाकडे वाहने देऊ नये असा आदेश संदेश त्यांनी यावेळी वाहनचालकांना दिला.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Goa Live Updates: गोवा पोलिस सतर्क, बेकायदेशीर दारु जप्त

Rajbagh Beach: राजबाग किनाऱ्याने घेतला 'मोकळा श्वास'! पर्यटन खात्याकडून सात बेकायदेशीर बांधकामे उद्ध्वस्त

Margao News: स्वच्छतेसंदर्भात मडगाव पालिकेचा महत्त्वाचा निर्णय; या कारणासाठी नागरिक, पर्यटकांकडून वसूल केला जाईल दंड

Cash For Job Scam: प्रिया यादवचा आणखी एक कारनामा उघड; चार बहिणींना घातला 80 लाखांना गंडा

Goa Crime: बनावट सही, स्टॅम्प वापरून वाढवली मालमत्तेची किंमत, कर्ज मिळवण्यासाठी तिघांचे कृत्य; अटकपूर्व जामिनावर 15 रोजी सुनावणी

SCROLL FOR NEXT