गोवा दौऱ्यात राहुल गांधी मच्छिमार बांधवांशी साधणार संवाद भेटणार

निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती गोवा अध्यक्ष गिरीश चोडणकार (Girish Chodankar) यांनी दिली आहे.
Girish Chodankar
Girish ChodankarDainik Gomantak

काँग्रेस नेते राहुल गांधी (Congress leader Rahul Gandhi) 30 ऑक्टोबर रोजी गोवा दौऱ्यावर येणार असून सकाळी दक्षिण गोव्यातील (Goa) वेळसाव इथं ते मच्छिमार बांधवांना भेटणार आहेत. त्यानंतर दुपारी पणजी (Panaji) इथं स्थानिक लोकांना भेटणार आहेत तर संध्याकाळी विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर काँग्रेस कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. अशी माहिती गोवा अध्यक्ष गिरीश चोडणकार (Girish Chodankar) यांनी दिली आहे.

Girish Chodankar
विधानसभा निवडणुकीपूर्वी दिल्लीत काँग्रेसची खलबतं

काँग्रेस प्रदेशाध्यक्ष गिरीश चोडणकर, विरोधी पक्षनेते दिगंबर कामत तसेच कार्यकारी अध्यक्ष आलेक्स रेजिनाल्ड काल दिल्लीला होते. या तिघांनाही राज्यातील सुरू असलेल्या घडामोडी तसेच युतीसंदर्भात आलेल्या प्रस्तावांवर निर्णय घेण्यासाठी बोलावून घेण्यात आले होते. ही निवडणूक स्वबळावर की युती करून लढविण्यावरूनच काँग्रेसच्या नेत्यांमध्ये मतभेद आहेत. भाजपला सत्तेवरून हटविण्यास युती हाच पर्याय आहे अशी बाजू यावेळी मांडण्यात आली असून आगामी निवडणुकीत पक्षाची रणनीती काय असावी तसेच कोणत्या मुद्यांवर प्रचारावर भर दिला जावा यासंदर्भात सखोल चर्चा झाली असल्याची माहिती मिळत आहे. काँग्रेस नेते राहुल गांधी हे 30 रोजी गोव्यात येत असून युतीचा प्रस्ताव दिलेल्या पक्षाच्या नेत्यांबरोबर चर्चा करण्याची शक्यता नाकारता येत नाही, अशी माहिती काँग्रेसच्या एका नेत्याने दिली आहे.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Dainik Gomantak | दैनिक गोमन्तक
dainikgomantak.esakal.com