कळंगुट: सध्या पर्वरी आणि कळंगुट या भागांमधून जलसफारीची ट्रिप तसेच स्वस्तात हॉटेलच्या खोल्या मिळवून देण्याचे आमिष दाखवून होणाऱ्या गुन्ह्यांचे प्रमाण वाढले आहे. वेगेवेगळ्या भागांमधून पीडित याबद्दल पोलिसांकडे तक्रार दाखल करत आहेत. पोलिसांनी देखील आरोपींच्या विरोधात कारवाई करण्यास सुरुवात केली आहे.
समोर आलेल्या माहितीनुसार नेरुल येथील एका कोको बीचवर जलसफारीचे आश्वासन देऊन पाच हजार रुपयांचा गंडा घातला असल्याची तक्रार एका तक्रारदाराने दाखल केलीये. या तक्रारीच्या आधारे पोलिसांनी डायव्हिंगस्कूबा डॉट ईन नामक एका संकेतस्थळाच्या मालकावर गुन्हा नोंद केलाय.
या संकेतस्थळावर आरोपीने डायव्हिंगस्कूबा डॉट ईनच्या नावाखाली पाच हजार रुपयांमध्ये जलसफारीसोबत स्कूबा डायव्हिंगस, जेवण, जीवनरक्षक उपकरणे आणि इतर साधनसुविधांची माहिती दिली होती. ऑनलाईन बुकिंगकरून कोको बीचवर आल्यानंतर मात्र तक्रारदाराला त्याची फसवणूक झाल्याची माहिती मिळाली.
अशाचप्रकारे कांदोळी येथे देखील सन अॅण्ड सॅण्ड नावाचे अपार्टमेंट भाड्याने देण्याचे आमिष दाखवून लखनऊ उत्तरप्रदेश येथील एका माणसाची फसवणूक झाल्याची माहिती उघड झाली आहे. संशयित आरोपीने फेसबुकवर सन अॅण्ड सॅण्ड अपार्टमेंटची पोस्ट टाकली होती, आणि या पोस्टमधील तपशिलांच्या आधारे तक्रारदाराने २४०० रुपये शुल्क देऊन अपार्टमेंट बूक केले, मात्र प्रत्यक्ष गोव्यात येऊन पाहता त्याला त्याची फसवणूक झाली असल्याचे समजताच त्याने पोलिसांमध्ये तक्रार नोंदवली. पोलिसांनी या आरोपीला कर्नाटकमधून अटक केली असून त्याला चार दिवसांची पोलीस कोठडी सुनावली गेली आहे.
राजस्थान,बिहार उत्तरप्रदेश अशा विविध भागांमधून सध्या फसवणूक झाल्याचे आरोप नोंदवले जात आहेत. आत्तापर्यंत सुमारे २० ते २५ तक्रारी गोवा पोलिसांकडे नोंदवण्यात आल्या असून गोव्यातील किनारी पोलीस याचा तपास करत आहेत.
दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.