Goa Crime: लैंगिक अत्याचाराचा खोटा आरोप, आईला वाचवण्यासाठी तरुणीने बदलला जबाब; संशयिताला जामीन मंजूर

Ponda Crime News: अटकेनंतर आता कोर्टाने संशयित आरोपीला २० हजार रुपये आणि इतर अटींसह सशर्त जामीन मंजूर केला आहे
Goa Crime News
Goa Crime NewsDainik Gomantak
Published on
Updated on

तिसवाडी: बालविवाह आणि लैंगिक अत्याचार प्रकरणी पोलिसांनी तिसवाडी येथील २८ वर्षीय युवकाला अटक केली होती. वर्ष २०२४ मध्ये झालेल्या या अटकेनंतर आता कोर्टाने संशयित आरोपीला २० हजार रुपये आणि इतर अटींसह सशर्त जामीन मंजूर केला आहे.

न्यायालयात सादर केलेले दस्तऐवज आणि पीडितेने दिलेली माहिती यांवर न्यायालयाला काहीसा संशय असल्याने अंतिम निकाल येईपर्यंत संशयित आरोपीला जेरबंद ठेवण्यात काहीच अर्थ नसल्याने न्यायालायाने त्याचा जामीन अर्ज मंजूर केला. या प्रकरणात फोंडा पोलिसांनी १७ नोव्हेंबर २०२४ रोजी गुन्हा दाखल केला होता.

Goa Crime News
Goa Crime: अंडर ट्रायल कैदी अझीझवर हल्ला करणाऱ्या कैद्याविरोधात गुन्हा दाखल; कोलवाळ पोलिसांची कारवाई!

पोलिसांनी नोंदवलेल्या तक्रारीनुसार, कारवार येथील एका मुलीला लग्न करण्यासाठी फोंड्यातील तिस्क-उसगांव येथे बोलावण्यात आले आणि लग्नाच्या आठवड्याभरानंतर अल्पवयीन मुलीला तिचे लग्न अगोदरच लग्न झालेल्या एका व्यक्तीसोबत झाले असल्याची माहिती मिळाली.

तिने त्वरित याबद्दल माहिती तिच्या घरी कळवली आणि तिच्या आई-वडिलांनी तिला पुन्हा कारवारला नेले. तेथील स्थानिक अंगणवाडीत काम करणाऱ्या सेविकेला या प्रकरणाबद्दल माहिती मिळताच तिने याबद्दल तक्रार नोंदवली.

मात्र या प्रकरणात संशयित आरोपी म्हणून अटक करण्यात आलेल्या युवकाने दिलेली माहिती वेगळीच आहे. वकिलांनी न्यायालयात केलेल्या अर्जानुसार युवतीने बाल विवाहासंदर्भात तिच्या आईला वाचवण्यासाठी म्हणून तिच्यासोबत लैंगिक अत्याचार झाल्याची खोटी माहिती दिली आहे. यासाठी संशयित आरोपी आणि तरुणीच्या विवाहाचे फोटो न्यायालयात सादर करून खोटी तक्रार दाखल केली आहे.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Related Stories

Curchorem Sexual Exploitation Case
Sai Dalvi Financial Fraud Case
Goa Court Bail Rejection
Goa Government Cyber Security
Goa News in Marathi - Dainik Gomantak
dainikgomantak.esakal.com