Goa One Time Settlement Dainik Gomantak
गोवा

Goa One Time Settlement: वीज-पाणी थकबाकीदारांना मोठा दिलासा; 'वन टाइम सेटलमेंट' पुन्हा राबविणार, मुख्यमंत्र्यांचे आश्वासन

Goa One Time Settlement Scheme Latest: राज्यातील नागरिकांची वीज आणि पाणी बिलांची थकबाकी फेडण्यासाठी सरकारकडून मागील पाच वर्षांत तीनवेळा ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना राबविण्यात आली.

गोमंतक ऑनलाईन टीम

पणजी: राज्यातील नागरिकांची वीज आणि पाणी बिलांची थकबाकी फेडण्यासाठी सरकारकडून मागील पाच वर्षांत तीनवेळा ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना राबविण्यात आली. मात्र, त्यानंतरही अनेक ग्राहकांकडे थकबाकी असल्याने आता शेवटची ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना राबविण्यात येणार असल्याचे मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांनी विधानसभेत सांगितले.

आमदार उल्हास तुयेकर यांनी शून्य प्रहरात हा मुद्दा उपस्थित करून नागरिकांना वीज व पाणी बिलांची थकबाकी फेडण्यासाठी पुन्हा ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना सुरू करण्याची मागणी केली. त्याला उत्तर देताना मुख्यमंत्र्यांनी ही योजना पुन्हा सुरू करण्याचे आश्वासन दिले. तुयेकर म्हणाले की, वीज आणि पाणी बिलांची थकबाकी वाढल्याने अनेक नागरिकांवर आर्थिक ताण आहे. ही योजना पुन्हा सुरू केल्यास नागरिकांना थकबाकी फेडणे शक्य होईल आणि सरकारची येणीही वसूल होतील.

शेवटची योजना

मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत म्हणाले की, ग्राहकांनी दर महिन्याला नियमितपणे वीज व पाणी बिले भरल्यास थकबाकीचा मोठा ताण निर्माण होणार नाही. मात्र, थकबाकीदारांना दिलासा देण्यासाठी शेवटची ‘वन टाइम सेटलमेंट’ योजना सुरू करण्याचे निर्देश अधिकाऱ्यांना देण्यात आले आहेत.

दैनिक गोमंतकचे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Goa news in Marathi and Goa local news on Tourism, Business, Politics, Entertainment, Sports and Goa latest news in Marathi on Dainik Gomantak. Get Goa news live updates on the Dainik Gomantak Mobile app for Android and IOS.

Cricket New Rules: क्रिकेटप्रेमींसाठी खूशखबर! स्टंप्स उडाले तरी फलंदाज आउट होणार नाही, काय आहे नवा नियम? VIDEO

Navpancham Rajyog 2026: शनि-मंगळाच्या नवपंचम राजयोगाची कमाल! 'या' 3 राशींच्या आयुष्यात येणार सोन्याचे दिवस; होणार तगडा धनलाभ

UPI MDR Charge: ऑनलाइन पेमेंट करणाऱ्यांसाठी महत्त्वाची बातमी, युपीआय पेमेंटवर एमडीआर चार्ज लावण्याचा निर्णय दिवाळीपर्यंत रद्द; NPCI चा मोठा निर्णय

8th Pay Commission Updates: केंद्रीय कर्मचाऱ्यांच्या पगारात होणार भरघोस वाढ? आयोगाच्या 5 मोठ्या अपडेट्सवर सर्वांचं लक्ष; 'फिटमेंट फॅक्टर'चं सोप्या भाषेत गणित

Goa Cricket: आर्यन नार्वेकरची कर्णधाराला साजेशी खेळी! गोव्याची बडोद्याविरुद्ध 4 बाद 227 धावांपर्यंत मजल

SCROLL FOR NEXT